भारतात दिले जाणारे हे लोकप्रिय वेलकम ड्रिंक्स्

अलीकडच्या काळात मॉकटेल आणि स्मुदीला भारतातही मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. पण भारतात दिले जाणारे  वेलकम ड्रिंक्स् तुम्हाला माहित आहेत का ?   

Feb 21, 2024, 19:48 PM IST
1/6

लिंबू सरबत

गर्मीच्या दिवसात शरीरातील पाण्याची कमी भरून काढण्यासाठी घरी आलेल्या पाहुण्यांना वेलकम करण्यासाठी लिंबू पाणी दिलं जातं.   

2/6

जलजीरा

जिरं, पुदिना, चिंच यांचं एकत्रित मिश्रण असलेला हा जलजीरा चवीला खारट,तिखट आणि आंबट असतो. जलजिऱ्यामुळे पचनसंस्था सुधारते. त्यामुळे भारतीय पारंपारिक समारंभात जलजीरा वेलकम ड्रिंक म्हणून देतात.  

3/6

कैरीचं पन्हं

उन्हाळ्यात कैरीचं पन्ह प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हाळ्यात शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवण्यासाठी कैरीचं पन्ह फायदेशीर ठरतं.   

4/6

थंडाई

होळी आणि महाशिवरात्रीला थंडाई पिण्याची पद्धत आहे. हे पारंपारिक भारतीय पेय असून हे दूधापासून बनविण्यात येते. 

5/6

पणकम

पणकम हे दाक्षिणात्य पेय असून लिंबाचा रस,वेलची आणि आलं यांचा समावेश असतो. दाक्षिणात्य शुभकार्य आणि लग्न सोहळ्यात आजही पाहुण्यांचं स्वागत पणकम देऊन केले जाते.   

6/6

गुलाब सरबत

गुलाब सरबत हे सुगंधीत असून भारतातल्या मोठमोठ्या समारंभात गुलाब सरबत देऊन पाहुण्यांचं स्वागत केलं जातं.