Indonesian Open: लक्ष्य सेनची दमदार सुरुवात; सायना नेहवालचीही विजयी घौडदौड सुरुच

इंडोनेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन टूर्नामेंटच्या क्वालिफाईंग राउंडमध्ये भारताचा वर्ल्ड चॅम्पियनशिप मेडलिस्ट बी साई प्रणितला पराभवाचा सामना कराला लागला आहे.  

Jan 25, 2023, 20:19 PM IST
1/5

भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन आणि सायना नेहवाल यांनी बुधवारी इंडोनेशिया मास्टर्स सुपर 500 टूर्नामेंटमध्ये पुरुष आणि महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश करण्यासाठी विरोधींवर विजय मिळवला आहे. 

2/5

सेनने सुरुवातीच्या सामन्यात जपानच्या कोडाई नाराओकाचा 21-12, 21-11 असा पराभव केला. सेनसाठी नवीन सिझनची सुरुवात मात्र चांगली झाली नव्हती.

3/5

सातव्या क्रमांकावर असलेल्या सेनचा सामना मलेशियाच्या निग जे योंगशी होणार आहे. तर सायनाचा सामना दोन चिनी खेळाडू झांग यिमान आणि आठव्या मानांकित हान यू यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.

4/5

दुसरी फेरी गाठणाऱ्या सायनाने चायनीज तैपेईच्या पै यू पो हिच्यावर 21-15, 17-21, 21-15 असा विजय मिळवत प्री क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश केला. किरण जॉर्ज आणि मिथुन मंजुनाथ पात्रता फेरीच्या पहिल्या फेरीत पराभूत झाल्याने बाहेर पडलेत. 

5/5

माजी जागतिक नंबर वन खेळाडू किदाम्बी श्रीकांतला पराभवाचा सामना करावा लागलाय. कार्तिकेय गुलशन कुमारने मलेशियाच्या येओ सेंग जोचा 21-8, 21-14 असा पराभव केला, परंतु लिन चुन यीकडून 16-21, 17-21 असा पराभव झाला.