24 कोटी, 20 कोटी! आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मिळालेल्या पैशांइतकी त्यांची कामगिरी आहे का? पाहा...

आयपीएलच्या सतराव्या हंगामात आतापर्यंत 21 सामने झाले आहेत. यात अनेक चुरशीचे सामने रंगलेत. यंदाच्या आयपीएलचं वैशिष्ट्य म्हणजे यंदा ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर अव्वाच्या सव्वा बोली लावण्यात आली. पण त्यांना जितके पैसे मिळाले त्या तुलनेत त्यांची कामगिरी आहे का? 

राजीव कासले | Apr 08, 2024, 17:56 PM IST

IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात आतापर्यंत 21 सामने झाले आहेत. यात अनेक चुरशीचे सामने रंगलेत. यंदाच्या आयपीएलचं वैशिष्ट्य म्हणजे यंदा ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर अव्वाच्या सव्वा बोली लावण्यात आली. पण त्यांना जितके पैसे मिळाले त्या तुलनेत त्यांची कामगिरी आहे का? 

1/7

आयपीएलच्या सतराव्या हंगामापूर्वी मिनी ऑक्शन पार पडलं. या ऑक्शनचं वैशिष्ट्य ठरलं ते ऑस्ट्रेलियन खेळाडू. सर्व दहा फ्रँचाईजीने ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी कोट्यवधीची बोली लावली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कने तर इतिहास रचला. कमिन्सवर 20 तर स्टार्कवर तब्बल 24 कोटींची बोली लागली. 

2/7

दिल्ली कॅपिटलने ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर खेळाडू मिचेल मार्शवर 6.5 कोटी रुपयांची बोली लावली. पण दिल्लीने आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यात मिचेल मार्शने केवळ 61 धावा केल्या आहेत. गोलंदाजीती त्याला केवळ एक विकेट घेता आलीय. आता दुखापतीमुळे तो किमान एक आठवडा खेळू शकणारन नाही

3/7

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेलला यंदाच्या हंगामात 14.25 कोटी रुपयांना रिटेन केलं. पण आरसीबीने आतापर्यंत खेळलेल्या पाच सामन्यात मॅक्सवेलची कामगिरी होती  0, 3, 28, 0 आणि 1 धावांची. तर पाच सामन्यात त्याने 4 विकेट घेतल्यात. 

4/7

यंदाच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने ऑस्ट्रेलियान खेळाडूंसाठी कोट्यवधी रुपये मोजले. आरबीसीने कॅमेरुन ग्रीनला 17.50 कोटी रुपयांना मुंबई इंडियन्सकडून ट्रेड केलं. पण पैशंच्या तुलनेत ग्रीनची कामगिरी फारशी समाधानकारक झालेली नाही. 5 सामन्यात ग्रीनची धावसंख्य आहे, 5, 9, 33 आणि 3. ग्रीनला आतापर्यंत केवळ 2 विकेट घेता आलेत आणि यासाठी त्याने 112 धावा मोजल्यात.

5/7

ऑस्ट्रेलियाचे ऑलराऊंडर मार्कस स्टॉईनिस आणि टीम डेव्हिडनेही आतापर्तंत आपल्या क्षमतेनुसार खेळ दाखवण्यात अपयशी ठरलेत. नाही म्हणायला या दोघांनी आपल्या कामगिरीच्या जोरावर संघाला एक-एक सामना जिंकन दिलाय. स्टोइनिसने लखनऊला गुजरातविरुद्ध सामना जिंकून दिला. तर टीम डेव्हिडने मुंबई इंडियन्ससाठी खेळताना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 21 चेंडूत 45 धावा केल्या होत्या.

6/7

यंदाच्या हंगामात ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क हा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. कोलकाता नाईट रायडर्सने स्टार्कसाठी तब्बल 24 कोटी 75 लाख रुपये मोजले. पण आतापर्यंत सर्वाधिका धावा देणाऱ्या गोलंदाजांमध्ये स्टार्कचा समावेश होतो. मिचेल स्टार्कने 3 सामन्यात तब्बल 125 धावा दिल्यात. याबदल्यात त्याला केवळ 2 विकेट घेता आल्यात.

7/7

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दुसरा महागडा खेळाडू ठरला तो म्हणजे ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप जिंकून देणारा कर्णधार पॅट कमिन्स. सनरायजर्स हैदराबादने कमिन्ससाठी 20 कोटी 50 लाख रुपये मोजले. पैशांच्या तुलनेत पॅट कमिन्स चांगली कामगिरी करताना दिसतोय. हैदराबादचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज अशी दुहेरी भूमिका तो बजावतोय. कमिन्सने पाच सामन्यात चार विकेट घेतल्यात. तर त्याच्या नेतृत्वात हैदराबाद पॉईंटटेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.