IPL 2024 : या 5 स्टार प्लेअर्सविना यावर्षीची आयपीएल अधूरी! 2 भारतीय नावं पण सामील

IPL 2024 : आयपीएल सुरू होण्यासाठी आता फक्त थोडे दिवस बाकी आहेत. आयपीएल 2024 चे रणांगण 22 मार्चपासून चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू यांच्या सामन्यापासून रंगणार आहे. यावर्षीही चेन्नईचे नेतृत्व धोनी करणार असून, बॅंगलोरच्या कॅप्टन्सीची कमान फाफ डू प्लेसीसच्या हाती आहे.  पण आयपीएल सुरू होण्याआधीच काही प्लेअर्सने दुखापतीमूळे IPL 2024 मधून एक्झिट घेतला आहे. यामध्ये काही भारतीय खेळाडूसूद्धा आहेत ज्यांच्यामूळे या वर्षीची आयपीएल अधूरी असणार आहे.

Mar 13, 2024, 14:57 PM IST
1/5

1. मार्क वूड -

लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मार्क वूड हा आयपीएल 2024 सुरू होण्याआधीच बाहेर झाला आहे. इंग्लंडने मार्क वूडला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये सामील केलेले आहे. यामूळे इंग्लंडने वूडला आयपीएलमध्ये खेळण्यास नकार दिलेला आहे, कारण आयपीएल 2024 नंतर लगेच टी 20 वर्ल्ड कप असल्यामुळे  इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्याचा वर्कलोड मॅनेज करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.   

2/5

2. जेसन रॉय -

कोलकाता नाइट राइडर्सचा या धाकड फलंदाजाने वैयक्तिक कारणामूळे आयपीएल 2024 मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतलेला आहे. IPL 2023 मध्ये रॉयने 8 मॅचेसमध्ये एकूण 285 रन्स बनवले होते.  केकेआरने फिल सॉल्टला जेसन रॉयच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून घेतले आहे.  

3/5

3. गस एटकिंसन

गस एटकिंसनला राजस्थान रॉयल्सने 1  कोटी रूपयात विकत घेतलेले होते, पण इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्याला वर्कलोड मॅनेज करण्याचे कारण देत आयपीएलमध्ये भाग घेण्यास नकार दिला आहे. गस एटकिंसनच्या जागी राजस्थानने श्रीलंकन वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीराला आपल्या स्कॉडमध्ये घेतलेले आहे.  

4/5

4. मोहम्मद शमी

मोहम्मद शमीच्या दुखापतीमूळे गुजरात टाइंटसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. मागच्या महिन्यात शमीची सर्जरी करण्यात आली होती. सर्जरीनंतर रिकव्हर होण्यासाठी मोहम्मद शमीला काही महिने लागणार असल्यामूळे, शमीने आयपीएल  2024 मधून ब्रेक घेतला आहे. IPL 2023 मध्ये मोहम्मद शमी हा पर्पल कॅप विनर होता.  

5/5

5. प्रसिद्ध कृष्णा

राजस्थान रॉयल्सचा आनखी एक वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याला रणजी ट्रॉफीत खेळताना दुखापत झाली होती, यानंतर त्याची क्वाड्रिसेप्स टेंडन ची सर्जरी करण्यात आली होती. यामूळे प्रसिद्ध क्रिष्णा आयपीएल 2024 ला मूकणार आहे. राजस्थान रॉयल्सने प्रसिद्धला 10 कोटी रूपयात विकत घेतले होते.