'या' भारतीयाने 2010 कोटी कमावले ते ही एका दिवसात! दुसऱ्याने 24 तासांत गमावले 3398 कोटी

Rs 2010 Crore Gain In One Day: ही व्यक्ती ना अंबानी आहे ना अदानी ना टाटा ना बिर्ला... तरीही या व्यक्तीची संपत्ती एका दिवसामध्ये तब्बल 2 हजार 10 कोटी रुपयांनी वाढली आहे. जाणून घ्या असं नेमकं घडलंय तरी काय आणि ही व्यक्ती आहे कोण? तसेच कोणाला बसला 3 हजार कोटींहून अधिकचा फटका जाणून घ्या...

Aug 12, 2024, 09:56 AM IST
1/8

Bhavish Aggarwal Net Worth OLA IPO

नफा आणि तोटा झालेल्या या दोन्ही व्यक्ती भारतीयच आहेत. जाणून घेऊयात त्यांच्यासंदर्भात...

2/8

Bhavish Aggarwal Net Worth OLA IPO

वर फोटोत दिसत असलेल्या व्यक्तीची संपत्ती एका दिवसात 2010 कोटींनी वाढली आहे असं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. या व्यक्तीचं नाव भावेश अग्रवाल असं आहे. ते ओला इलेट्रीक्स मोबिलीटी लिमिटेड कंपनीचे संस्थापक आहेत.

3/8

Bhavish Aggarwal Net Worth OLA IPO

शुक्रवारी म्हणजेच 9 ऑगस्ट 2024 रोजी ओला कंपनीचा आयपीओ बाजारपेठेत दाखल झाल्याने भावेश यांना 2 हजार कोटींहून अधिक रुपयांचा फायदा झाला आहे. 

4/8

Bhavish Aggarwal Net Worth OLA IPO

भारतामधील कोणत्याही स्टार्टअप कंपनीने शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर आपल्या मालकाला करुन दिलेला हा सर्वात मोठा फायदा ठरला आहे. भावेश अग्रवाल यांच्याबरोबरच या यादीत कोण लाभवंत आहेत ते पाहूयात आणि कोणाला कंपनी बाजारात लिस्ट झाल्यानंतर 3 हजार कोटींहून अधिक फायदा झालेला ते ही जाणून घेऊयात...

5/8

Bhavish Aggarwal Net Worth OLA IPO

यापूर्वी नायका कंपनीचा आयपीओ बाजारात आला होता तेव्हा कंपनीच्या संस्थापक फाल्गुनी नायर यांना 1879 कोटींचा फायदा एकाच दिवसात झाला होता. त्यांच्या कंपनीने एकाच दिवसात 1 लाख कोटींचे मार्केट कॅपिटलायझेशन ओलांडलं होतं.  

6/8

Bhavish Aggarwal Net Worth OLA IPO

झोमॅटो लिमिटेडचे दिपेंद्र गोयल यांची संपत्तीही कंपनीचा आयपीओ बाजार आल्याच्या दिवशी तब्बल 1847 कोटींना वाढली होती.   

7/8

Bhavish Aggarwal Net Worth OLA IPO

'ममा अर्थ' कंपनीच्या आयपीओ लिस्टींगनंतर कंपनीची मालकीण गझल अलघ आणि वरुण अलघ यांची संपत्ती 149 कोटींनी वाढली होती. त्यांच्या कंपनीचा आयपीओ 7 नोव्हेंबर 2003 रोजी बाजारात आलेला. 

8/8

Bhavish Aggarwal Net Worth OLA IPO

मात्र दरवेळेस आयपीओ आल्याने फायदाच होतो असं नाही. पेटीएमची मालकी असलेल्या वन 97 कम्युनिकेशनचे मालक विजय शेखर शर्मा यांची संपत्ती 3398 कोटींनी कमी झाली होती जेव्हा आयपीओनंतर कंपनीचे शेअर्स 28 टक्क्यांनी पडले होते.