अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडूनही X च्या नावात INC! X चा यूझरनेम बदलता येतो का?

अनेक युजर्सना ट्विटर म्हणजेच एक्स अकाऊंटवरील युजरनेममध्ये बदल करता येत नाही असं वाटतं. तुम्हालाही तसंच वाटत असेल तर हा गैरमसज दूर करुन घ्या.   

Feb 12, 2024, 17:00 PM IST

 

 

1/9

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांनी पक्षाचं सदस्यत्व आणि आमदारकी सोडली आहे. अशोक चव्हाण यांनी ट्विटर प्रोफाईलमध्ये बदल केले आहेत. मात्र युजरनेममध्ये अद्यापही INC असा उल्लेख आहे.   

2/9

अनेक युजर्सना ट्विटर म्हणजेच एक्स अकाऊंटवरील युजरनेममध्ये बदल करता येत नाही असं वाटतं. तुम्हालाही तसंच वाटत असेल तर हा गैरमसज दूर करुन घ्या.   

3/9

एक्स अकाऊंटवरील युजरनेम अत्यंत सहजपणे बदलता येतं. त्यासाठी नेमकी काय प्रक्रिया आहे हे ते समजून घ्या.  

4/9

सर्वात प्रथम ट्विटर अकाऊंट ओपन करा. यानंतर आपल्या प्रोफाइल इमेजवर क्लिक करा. डेस्कटॉपवर असल्यास तुम्हाला समोरच पर्याय दिसेल.   

5/9

तुम्ही मोबाईलमध्ये ओपन केलं तर Setting and Support वर क्लिक करा. यानंतर Setting and Privacy पर्याय दिसेल तो ओपन करा. डेस्कटॉपवर तुम्हाला More वर क्लिक केल्यावर हा पर्याय दिसेल.   

6/9

यानंतर Your Account मध्ये जा.   

7/9

यानंतर Account Information हा पर्याय निवडा.   

8/9

यानंतर Username हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला युजरनेम बदलण्याचा पर्याय मिळेल. मोबाईलमध्ये Current आणि New असे दोन पर्याय येतील.   

9/9

तिथे तुम्हाला हवे असणारं नवं युजरनेम तुम्ही टाकू शकता. जर ते युजरनेम उपलब्ध असेल तर तुम्हाला सहजपणे मिळेल. अशाप्रकारे तुम्ही यशस्वीपणे युजरनेम बदलू शकता.