महाराष्ट्रात रिव्हर राफ्टिंगचा थरार! थ्रील अनुभवायचा असाल तर कोकणातील या पर्यटनस्थळाला नक्की भेट द्या...

महाराष्ट्रात रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवायचा असेल तर कोलाडला नक्की भेट द्या.   

| Aug 11, 2024, 23:47 PM IST

Kolad River Rafting : रायगड जिल्ह्यातल्या कुंडलिका नदीतल्या रिव्हर राफ्टींगला गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटकांची पसंती मिळत आहे. मुळशी धरणातून कुंडलिका नदीला सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा वापर करत स्थानिकांनी हे रिव्हर राफ्टींग सुरू केल आहे. 

1/7

निसर्गसौंदर्याने नटलेल्या महाराष्ट्रात पर्यटकांना ऋषिकेशचा फिल घेता येईल. महाराष्ट्रात देखील पर्यटकांना  ऋषिकेशसारखा रिव्हर राफ्टिंगचा आनंद लुटता येतो.

2/7

 येथे  हायकिंग, कॅम्पिंग, नेचर वॉक आणि ट्रेकिंगसाठी देखील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. 

3/7

व्हाईट वॉटर राफ्टिंग आणि बोटिंग या पर्यटकांसाठी विलक्षण अनुभव असतो. प्रचंड वेगाने वाहणाऱ्या नदीत पर्यटक रिव्हर राफ्टिंगचा आनंद लुटतात.

4/7

भीरा डॅम जवळ अनेक साहसी खेळांचा थरारक अनुभव पर्यटक घेतात. जंगल सफारी आणि पक्षी निरीक्षणासाठी देखील येथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात.   

5/7

कोलाड मधील कुंडलिका नदी पात्रात केले जाणारे रिव्हर राफ्टिंग हे पर्यटाकांचे प्रमुख आकर्षण आहे.   

6/7

 कोलाड मुंबईपासून सुमारे 110 किलोमीटर अंतरावर तर पुण्यातून देखील येथे तासाभरात पोहचता येते.

7/7

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असलेले कोलाड हे ठिकाण खास रिव्हर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहे.