दिवाळीच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करु नका! अन्यथा माता लक्ष्मी होईल नाराज

Diwali 2024 : हिंदू धर्मात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येतो. यादिवशी माता लक्ष्मी आपल्या घरी येतात, अशी मानता आहे. ज्या घरात स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो.   

Oct 25, 2024, 17:11 PM IST
1/8

दिवाळीच्या दिवशी जर तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराची सजावट करतात, दारात रांगोळी काढतात, लक्ष्मी मातेसह गणेश आणि कुबेराची पूजा करतात.   

2/8

पण दिवाळीच्या दिवशी तुम्ही जर तुम्ही काही चुका केल्यास माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते. तसंच तुमच्यावर आर्थिक संकट येऊ शकतं. दिवाळीला कोणत्या चुका करु नयेत जाणून घ्या.   

3/8

संपूर्ण घराची स्वच्छता करा. विशेषतः पूजा स्थळी आणि मंदिराच्या आजूबाजूला कोणतीही अशुद्ध वस्तू म्हणेजच बूट, चप्पला आणि कचरा इत्यादी ठेवू नका.

4/8

दिवाळीच्या दिवशी नॉनव्हेजचं सेवन करु नये. त्यासोबत या दिवशी मद्यपान चुकूनही करु नका. तुमची ही चूक महागात पडू शकते.   

5/8

दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन करताना लोखंडी, स्टिल, काच आणि प्लास्टिकची भांडी वापरु नका. पूजेसाठी चांदी, तांबे आणि पितळेची भांडी वापरु शकता. यादिवशी मातीच्या भांड्याना विशेष महत्त्व असतं. 

6/8

दिवाळीच्या दिवशी घरातील महिलांना अपशब्द वापरु नये, त्यांच्याशी वाद किंवा भांडण केल्यास माता लक्ष्मी नाराज होते. 

7/8

लक्ष्मीपूजन म्हणजे पैशांची पूजा असते. त्यामुळे या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नये किंवा कोणाकडूनही पैसे उधार घेऊ नयेत.   

8/8

दिवाळीच्या दिवशी पूजा केल्यानंतर आणि दिवे लावल्यानंतर झोपू नये. शिवाय घराचे दार बंद करु नये. असं म्हणतात यादिवशी माता लक्ष्मी आपल्या घरी येत असते. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)