वडिलांचा 312 कोटींचा घोटाळा, तिचं शिक्षण टाटांच्या संस्थेत अन्...; पवारांनी उमेदवारी दिलेली 'ही' 26 वर्षीय तरुणी कोण?

Maharashtra Assembly Election 2024 Who Is Siddhi Kadam: परवापर्यंत केवळ केवळ एका ठराविक भागामध्ये चर्चेत असलेला हा तरुण चेहरा सध्या महाराष्ट्रभर चर्चेत आहे. नेमकी ही तरुणी आहे तरी कोण आणि राज्यातील सर्वात वरिष्ठ नेते असलेल्या शरद पवारांच्या पक्षाने तिच्यावर एवढा विश्वास का टाकला आहे जाणून घेऊयात...

| Oct 28, 2024, 16:00 PM IST
1/11

siddhikadammohol

सध्या संपूर्ण राज्यात या तरुणीची चर्चा आहे. नेमकी ही तरुणी आहे तरी कोण आणि शरद पवारांच्या पक्षाने तिला यंदाच्या विधानसभेसाठी संधी का दिली आहे जाणून घेऊयात...

2/11

siddhikadammohol

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी, 27 ऑक्टोबर रोजी आपल्या पक्षाची तिसरी यादी जाहीर केली. या उमेदवारी यादीमध्ये एकूण 9 उमेदवारांचा समावेश आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुंबईतील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेत उमेदवारांची घोषणा केली.   

3/11

siddhikadammohol

या नऊ उमेदवारांमध्ये एका तरुणाचाही समावेश असून तिच्या नावाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. मोहोळ मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या पक्षाने रमेश कदम यांच्या मुलीला तिकीट दिलं आहे. सिद्धी रमेश कदम (Siddhi Kadam) असं तिचं नाव आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर सिद्धीची चांगलीच चर्चा आहे.  

4/11

siddhikadammohol

मोहोळचे माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) यांच्या कन्या अशी सिद्धी यांची ओळख सांगता येईल. मुंबईतील टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्समधून त्यांनी शिक्षण पूर्ण केल्याचा उल्लेख स्वत: जयंत पाटील यांनी पत्रकरांशी संवाद साधता केला.

5/11

siddhikadammohol

सोलापूर जिल्ह्यातील इतिहासात आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारांपैकी सिद्धी या सर्वात तरुण उमेदवार ठरल्या आहेत. सिद्धी या अवघ्या 26 वर्षांच्या आहे. रमेश कदम हे अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ गैरव्यवहार प्रकारणात अटकेत आहेत. अशा परिस्थितीमध्ये वडील तुरुंगात असताना 2019 च्या निवडणुकीत सिद्धी यांनीच त्यांचा झंझावाती प्रचार केला होता. त्यावेळी अपक्ष म्हणून उभ्या राहिलेल्या रमेश कदम यांना 25 हजार मतं मिळालेली. 

6/11

siddhikadammohol

अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील 312 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार असलेले रमेश कदम यांनी तुरुंगवास भोगला आहे. रमेश कदम यांनी 8 वर्ष ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात तुरुंगवास भोगल्यानंतर ते ऑगस्ट 2023 मध्ये तुरुंगातून बाहेर पडले.

7/11

siddhikadammohol

जामीन मिळाल्यानंतर रमेश कदम पुन्हा सक्रीय राजकारणामध्ये आले. मागील काही काळापासून मोहोळमधून उमेदवारी मिळवण्यासाठी रमेश कदम इच्छूक होते. यासंदर्भात त्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. मात्र रमेश कदम यांच्यावरील आरोप फार गंभीर असल्याने त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली.

8/11

siddhikadammohol

मात्र मागील निवडणुकीमध्ये वडीलांसाठी सिद्धी कदम यांनी केलेलं काम पाहून शरद पवारांच्या पक्षाने अवघ्या 26 वर्षीय सिद्धीला संधी दिल्याची चर्चा आहे.  

9/11

siddhikadammohol

खरं तर मोहोळमधून शरद पवारांच्या पक्षाचं निवडणूक चिन्ह तुतारीवर लढण्यासाठी अनेकजण इच्छुक होते. राजू खरे, संजय क्षीरसागर यासारख्यांची नावं यामध्ये आघाडीवर होती. मात्र सिद्धी यांना उमेदवारी देण्यात आली.  

10/11

siddhikadammohol

मात्र असं असतानाच शरद पवारांच्या पक्षाने सिद्धीसारख्या फारसा अनुभव नसलेला उमेदवार दिल्याने मोहोळमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.   

11/11

siddhikadammohol

सिद्धी यांची थेट लढत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेले विद्यमान आमदार यशवंत माने यांच्याशी असणार आहे. मोहोळमध्ये राजन पाटील यांचे वर्चस्व असून त्यांचं सहकार्य माने यांना मिळेल असा अंदाज असल्याने सिद्धी यांच्या समोर मोठं आव्हान असणार आहे.