अभिमानास्पद! महाराष्ट्राव्यतिरिक्त 'या' राज्यांत बोलली जाते मराठी भाषा

महाराष्ट्र आणि मराठी भाषेसाठी आजचा अभिमानाचा क्षण ठरला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. 

| Oct 04, 2024, 13:17 PM IST

महाराष्ट्र आणि मराठी भाषेसाठी आजचा अभिमानाचा क्षण ठरला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. 

1/7

अभिमानास्पद! महाराष्ट्राव्यतिरिक्त 'या' राज्यांत बोलली जाते मराठी भाषा

Marathi accorded classical language Apart from Maharashtra Marathi is spoken in these state

मराठी भाषेला जवळपास 2000 वर्षांचा इतिहास आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी 2013पासून प्रयत्न केले जात होते. मराठी बरोबरच पाली, प्राकृत, असमिया आणि बंगाली भाषेलादेखील अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.

2/7

Marathi accorded classical language Apart from Maharashtra Marathi is spoken in these state

मराठी भाषा ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे. मात्र महाराष्ट्रा व्यतिरिक्त इतर राज्यातही मराठी बोलली जाते. मराठा साम्राजाच्या विस्तार ज्या ज्या राज्यात झाला त्या राज्यांत अजूनही मराठीच्या खुणा दिसून येतात. ती राज्य कोणती ते जाणून घेऊया. 

3/7

Marathi accorded classical language Apart from Maharashtra Marathi is spoken in these state

महाराष्ट्र वगळता गोवा राज्य, दमण दीव, दादरा नगर हवेली या केंद्रशासित राज्यांत मराठी भाषा बोलली जाते. 

4/7

Marathi accorded classical language Apart from Maharashtra Marathi is spoken in these state

कर्नाटकातील बिदार, गुलबर्ग, बेळगाव जिल्ह्यात मराठी ही प्रमुख भाषा आहे. 

5/7

Marathi accorded classical language Apart from Maharashtra Marathi is spoken in these state

मध्य प्रदेशात मराठी ही हिंदीनंतर बोलली जाणारी दुसरी भाषा आहे. जबलपूर, इंदौर, बडोदा, ग्वाल्हेर या शहरातही मराठी भाषा बोलली जाते. 

6/7

Marathi accorded classical language Apart from Maharashtra Marathi is spoken in these state

 छत्तीसगड हे राज्य मध्यपद्रेशमध्ये यायचं नंतर त्याला स्वतंत्र राज्य घोषित केले. त्यामुळं छत्तीसगडमध्ये मराठी भाषा बऱ्यापैकी बोलली जाते. 

7/7

Marathi accorded classical language Apart from Maharashtra Marathi is spoken in these state

तेलंगणा राज्यातील महाराष्ट्राला लागून असलेल्या भागातही मराठी बोलले जाते. तंजावर या शहरातही मराठी बोलली जाते.