आशिया कपमधील 'हे' 2 खेळाडू म्हणजे टीम इंडियाचं भविष्य; मॅथ्यू हेडनची मोठी भविष्यवाणी!

Aug 22, 2023, 15:04 PM IST
1/5

आशिया कप

यंदाच्या आशिया कप स्पर्धेसाठी शुभमन गिल, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा आणि इशांत किशन यांना संधी देण्यात आलीये. तर हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा आणि शार्दुल यांचा अष्टपैलू म्हणून समावेश करण्यात आला आहे. 

2/5

मॅथ्यू हेडन

तरुण खेळाडूंमुळे आता टीम इंडियाची ताकद आणखीन वाढल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता ऑस्ट्रेलियाचा स्टार रांगडाला प्लेयर मॅथ्यू हेडन याने मोठं वक्तव्य केलंय.

3/5

शुभमन गिल आणि टिळक वर्मा

भारतीय संघात स्थान मिळवणारे शुभमन गिल आणि टिळक वर्मासारखे युवा फलंदाज आशिया चषक स्पर्धेत छाप पाडू शकतील, अशी आशा ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडनने व्यक्त केली.

4/5

तिलक वर्मा

आपण पाहिलं तर शुभमन गिलने जास्त वनडे सामने खेळले नाहीत. तर दुसरीकडे तिलक वर्माने डेब्यू देखील केला नाही. मात्र, दोन्ही खेळाडू अधिक चांगली कामगिरी करतील, अशी अपेक्षा हेडनने व्यक्त केली आहे.

5/5

टीम इंडियाचं भविष्य

सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल यांच्या येण्याने टीम इंडिया अधिक ताकदवान झाल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे टीमचं भविष्य देखील चांगल्या हातात आहे, असं मत मॅथ्यू हेडनने मांडलं आहे.