मुंबईत 'महाराष्ट्र श्री'चा थरार, शहरातील पीळदार देहयष्टीला ग्रामीण भागातल्या रांगड्या शरीरयष्टीचं आव्हान
61 व्या महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी शिवसेना सचिव युवानेते सिद्धेश कदम यांनी पुढाकार घेतला आहे. राज्यभरातील दमदार आणि जोरदार शेकडो शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग असलेल्या या राज्य अजिंक्यपद स्पर्धेला वेगळेच ग्लॅमर प्राप्त झालं आहे.
राजीव कासले
| Mar 08, 2024, 19:49 PM IST
1/7

हरमीत सिंग, उमेश गुप्ता, संतोष भरणकर, गणेश बनकर, उदय देवरे, उबेद पटेल , संदेश नलावडे, विशाल सिन्हासारखे दिग्गज खेळाडू आपल्या सुपर फॉर्मात असल्यामुळे येत्या रविवारी 10 मार्चला होणार्या महाराष्ट्र श्री स्पर्धेत किताबासाठी काँटे की टक्कर होणार असल्याची शक्यता महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस अजय खानविलकर यांनी वर्तवली आहे.
2/7

आजवर महाराष्ट्रातील शरीरसौष्ठवपटूंसाठी प्रतिष्ठेची स्पर्धा असलेल्या महाराष्ट्र श्री स्पर्धेत मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर या शहरी भागातील खेळाडूच सहभागी व्हायचे मात्र शरीरसौष्ठवाची गुणवत्ता ग्रामिण भागातही मोठ्या संख्येने दिसत असल्यामुळे शहरातील पीळदार देहयष्टीला ग्रामीण भागातल्या रांगड्या शरीरयष्टीचे जबरदस्त आव्हान असेल.
3/7

या स्पर्धेच्या निमित्ताने मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना शहरी विरुद्ध ग्रामिण असा शरीरसौष्ठवाचा अनोखा पीळदार थरार पाहायला मिळेल, असा विश्वास महाराष्ट्र बॅाडी बिल्डर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॅा. संजय मोरे यांनी व्यक्त केलाय. महाराष्ट्र श्रीबरोबर महिलांची मिस महाराष्ट्र श्री म्हणजेच महिलांची शरीरसौष्ठव स्पर्धा आणि फिटनेस फिजीक अजिंक्यपद स्पर्धा खेळविली जाणार आहे.
4/7

महाराष्ट्रातील शरीरसौष्ठवपटूंना विम्याचं कवच लाभावे म्हणून शिवसेना सचिव सिद्धेश कदम यांनी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील पीळदार सौंदर्य मुंबईत दाखल होणार असून सहभागी स्पर्धकांसह सर्वच शरीरसौष्ठवपटूंना विम्याचे कवच देण्याचे सिद्धेश कदम यांनी जाहीर केलं आहे. राज्यातील किमान 500 खेळाडूंचा 2 लाखांचा विमा उतरविला जाणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे.
5/7

6/7
