विले-पार्ले नाव कसं पडलं? मुंबईतल्या या भागाने देशाला दिलाय सर्वात मोठा ब्रँड
Vile Parle Story : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात दररोज हजारो कोटी रुपयांची उलाढाल होते. अनेक उपनगरं मिळून कॉस्मोपॉलिटन मुंबई शहर तयार झालं आहे. इथल्या प्रत्येक उपनगराला ऐतिहासिक वैशिष्ट्य आहे. मुंबईतलं विलेपार्ले हे असंच एक उपनगर. विलेपार्ले या शब्दावरुन हे नाव एखाद्या इंग्रज अधिकाऱ्यांने ठेवलं असेल असं वाटतं. पण या नावा मागची कहाणी मोठी रंजक आहे.
राजीव कासले
| Jul 08, 2024, 20:00 PM IST
1/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/08/763074-parle1.jpg)
विलेपार्ले हे मुंबईतलं प्रसिद्ध ठिकाण आहे. या नावावरुन लोकांना हे नाव एखाद्या इंग्रज अधिकाऱ्याने ठेवलं असावं असं वाटतं. विलेपार्ले नावाबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जातात. शेकडो वर्षांपूर्वी या भागात अनेक छोट्या-छोट्या वस्त्या आणि झोपड्या होत्या. विलेचा अर्थ गाव असा होतो, तर पार्ले म्हणजे पोर्तुगीज शब्द पावडे वरुन वरुन पडलं. याचा अर्थ वस्ती असा होता.
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/08/763072-parle2.jpg)
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/08/763070-parle3.jpg)
4/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/08/763068-parle5.jpg)
स्वातंत्रानंतर पार्ले बिस्किटच्या व्यवसायात मंदी आली. विभाजनामुळे गहूचं उत्पादन घटलं. त्यामुळे पार्ले कंपनीला आपली ग्लुको बिस्किटाचं उत्पादन थांबवावं लागलं. यातून सावरत पार्ले-जीने आपल्या ब्रांडिंगवर लक्ष केंद्रीत केलं. एता लहान मुलीचा फोटो बिस्किटच्या पुड्यावर छापण्यात आला. या मुलीला पार्ले गर्ल नावाने ओळख मिळाली
5/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/08/763066-parle4.jpg)
6/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/08/763065-parle6.jpg)