NASA च्या दुर्बिणीनं टीपला 28 अब्ज प्रकाशवर्ष दूरचा, सूर्याहून दुप्पट मोठा- उष्ण तारा

भारत, रशिया ही राष्ट्र सध्या लूनार मिशनला प्राधान्यस्थानी ठेवत असताना NASA नं अवकाशातील एक अदभूत नजारा पुन्हा एकदा सर्वांसमोर ठेवला आहे. 

Aug 16, 2023, 13:18 PM IST

भारताची (Chandrayaan 3) चांद्रयान 3 मोहिम सध्या महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलेली असतानाच आता अवकाशाशी संबंधित इतरही काही महत्त्वाचे खुलासे होताना दिसत आहेत. अशी एक रंजक बाब नुकतीच समोर आली असून, पाहणाऱ्यांचे डोळे विस्फारले आहेत. 

1/7

नासा

NASA James Webb Telescope captures most distant star ever seen see photos

काही दिवसांपूर्वीच (NASA) नासाकडून एका ताऱ्याचा अंत होतानाचे क्षण जगासमोर आणण्यात आले होते. सूर्याचा अंतही कैक वर्षांनंतर अशाच पद्धतीनं होईल असा कयास यानंतर जाणकारांनी लावला होता. 

2/7

जेम्स वेब

NASA James Webb Telescope captures most distant star ever seen see photos

अंतराळातील ही दृश्य टीपण्यासाठी हबल, जेम्स वेब अशा आधुनिक तंत्रज्ञानाची जोड असणाऱ्या दुर्बिणींचा वापर केला जातो. हा आहे नासाचा जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप. 

3/7

ग्रॅविटेशनल लेन्सिंग तंत्र

NASA James Webb Telescope captures most distant star ever seen see photos

ग्रॅविटेशनल लेन्सिंग तंत्राचा (gravitational lensing technique) वापर करत नासाच्या  James Webb Space Telescope नं आतापर्यंतचा सर्वाधिक दूरवरचा तारा शोधला आहे. Earendel असं या ताऱ्याचं नाव. इअरेनडेल असा त्याचा उच्चार. Sunrise Arc आकाशगंगेतून या ताऱ्याचं अस्तित्वं प्रकाशझोतात आलं आहे. 

4/7

उभरता तारा

NASA James Webb Telescope captures most distant star ever seen see photos

एका इंग्रजी शब्दातून Earendel हे नाव मिळालं असून, त्याचा अर्थ सकाळचा तारा किंवा उभरता तारा असा होतो. या ताऱ्याची पहिली कुणकुण हबल स्पेस टेलिस्कोपला 2022 मध्ये लागली होती.   

5/7

28 अब्ज प्रकाशवर्षे दूर

NASA James Webb Telescope captures most distant star ever seen see photos

प्राथमिक स्तरावर हा तारा पृथ्वीपासून 12.9 अब्ज प्रकाशवर्षे दूर असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण, आकाशगंगेचा विस्तार आणि प्रकाशाचा वेग पाहता तो पृथ्वीपासून 28 अब्ज प्रकाशवर्षे दूर असल्याचा अंदाज अंतराळसंशोधक वर्तवत आहेत. 

6/7

Earendel

NASA James Webb Telescope captures most distant star ever seen see photos

सध्याच्या माहितीनुसार Earendel हा एक बी टाईप स्टार आहे. याचाच अर्थ तो सुर्याहून दुपटीनं उष्ण आणि अब्जपटींनी मोठा असल्याचं म्हटलं जात आहे. अशा ताऱ्यांसोबत सहसा इतरही तारे असतात. पण, त्याबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.   

7/7

कुतूहल

NASA James Webb Telescope captures most distant star ever seen see photos

नासानं शेअर केलेले हे फोटो पाहता जागतिक स्तरावरून सध्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपबद्दल कुतूहल व्यक्त केलं जात आहे. इतकंच नव्हे, तर हे फोटो वारंवार पाहिलेही जात आहेत.