विमान प्रवासाचे नियम बदलले; फिरायला जाण्याअगोदर जाणून घ्या
ख्रिसमसच्या सुट्ट्या सुरु झाल्या आहेत अनेकांनी फिरण्याचे प्लान केलेत. पण बाहेर पडण्याअगोदर विमानातील सामानाचे बदलले नियम समजून घ्या. सोबत किती बॅगा नेऊ शकता, हे समजून घ्या म्हणजे प्रवासात गैरसोय होणार नाही.
2024 या वर्षाचा निरोप घेतला जाणार आहे तर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सगळे सज्ज झाले आहे. अनेक लोक नवीन वर्षाचं स्वागत आणि सुट्ट्या घालवण्यासाठी प्रवास करतात. प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने विमान प्रवास हा सर्वोत्तम पर्याय ठेवतो. जर तुम्ही देखील नवीन वर्षांचं प्लानिंग करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत गरजेची आहे. विमानातील सामानाचे नियम (Flight Luggage Rules) बददले आहे. जर हे नियम न समजून घेता एअरपोर्टला पोहोचलात तर तुमची प्रवासात गैरसोय होऊ शकते. नागरिक उड्डयन ब्युरो (BCAS) ने हँड बॅग पॉलिसीमध्ये बदल केला आहे.