45 कोटी वर्षांपासून पृथ्वीवर जिवंत असलेला अद्भूत मासा; जबडा नसताना गिळंकृत केला डायनासोर

एका अशा माशाची प्रजाती समोर आली आहे जी 45 कोटी वर्षांपासून पृथ्वीवर जिवंत आहे. 

Sep 24, 2023, 23:22 PM IST

Entosphenus tridentatus : पृथ्वीतलावर लाखो करोडो जीव अस्तित्वात आहेत. काहींच्या प्राजची देखील नष्ट झाल्या आहेत. मात्र, पृथ्वीतलावर एक असा अद्भूत मासा आहे जो 45 कोटी वर्षांपासून जिवंत आहे. या माशाला जबडा नाही तरी देखील त्याने डायनासोर गिळंकृत केला होता. 

1/7

या माशाचे वैशिष्य म्हणजे याला जबडा नाही. या मासा दिसताना सापासारखा दिसतो. मात्र, याच्या पुढच्या भागावर डोळे आणि टोकदार दात आहेत.  

2/7

माशाच्या या प्रजातीने पृथ्वीवर आतापर्यंत झालेल्या चार मोठ्या सामूहिक विनाशांपासून स्वतःला वाचवले आहे. 

3/7

ईल माशासारखे दिसते. पण त्याला जबडा नसतो. हे मासे रक्क शोषून घेतात. अशा प्रकारे त्यांनी डायनासोर ची शिकार केल्याचा दावा केला जातोय.

4/7

या माशाच्या 40 प्रजाती आहेत. मादी लॅम्प्रे मासे एका वेळी दोन लाख अंडी घालते. स्वच्छ पाण्यात गर्भधारणेची संपूर्ण प्रक्रिया तीन ते चार आठवड्यांत पूर्ण होते. अंड्यातून अळ्या बाहेर येताच त्या किमान दहा वर्षांपर्यंत पाण्याच्या तळाशी राहतात. अशा प्रकारे यांचे प्रजनन होते.  

5/7

45 कोटी वर्षे जुने असलेल्या अग्नाथा या प्राचीन माशांच्या समूहातील हे मासे आहेत. 

6/7

हे मासे सामान्यतः उत्तर पॅसिफिक महासागरात आढळतात. सामान्यतः कॅलिफोर्निया ते अलास्का. याशिवाय हे बेरिंग समुद्रातही आढळते. म्हणजे रशियापासून जपानच्या किनाऱ्यापर्यंत हे मासे आढळतात.  

7/7

या माशाचे नाव पॅसिफिक लॅम्प्रे असे (Pacific Lamprey)आहे.  या माशाला वैज्ञानिक भाषेत Entosphenus tridentatus असे म्हणतात.