Burusho People: रहस्यमयी महिला! 'या' वयाच्या 80 व्या वर्षीही दिसतात तरुण
'या' महिला वयाच्या 80 व्या वर्षीही दिसतात तरुण, जाणून घ्या त्यांचे रहस्य
Burusho Women : पाकिस्तानच्या (Pakistan) ताब्यात असलेलं काश्मीरमध्ये (PoK) हुंझा व्हॅली (Hunza Valley) आहे, जिथे बुरुशो समुदाय (Burusho Cummunity) राहतो. या समुदायाची खास गोष्ट म्हणजे याचे सदस्य दीर्घायुष्य जगतात. असे म्हणतात की हुंजा खोऱ्यात राहणारे बुरुशो समुदायाचे पुरुष कधी कधी वयाच्या 90 व्या वर्षी पिता बनतात. त्यांच्या महिला देखील जगातील इतर महिलांपेक्षा जास्त वयात गर्भवती होतात. जगभरात या समाजातील महिलांच्या सौंदर्याची आणि जीवनशैलीची चर्चा आहे, जी त्यांना दीर्घकाळ तरुण ठेवते.



