प्रियंका चोप्राने वहिनीचे केले जंगी स्वागत, पती निकने शेअर केले Unseen फोटो

प्रियंका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्राने त्याची प्रेयसी नीलम उपाध्याय हिच्याशी 7 फेब्रुवारीला थाटामाटात लग्न केले आहे.   

Intern | Feb 11, 2025, 15:12 PM IST
1/8

भावाच्या लग्नानंतर, प्रियंका चोप्राने तिच्या नवीन वहिनीचे घरात जंगी स्वागत केले या फोटोमध्ये सगळे खूप आनंदी दिसत होते.  

2/8

निक जोनासने सिद्धार्थ-नीलमच्या लग्नाचे काही Unseen फोटो शेअर केले आहेत.

3/8

या फोटोमध्ये, सिद्धार्थची नवविवाहित वधू तिच्या सासरमंडळीसोबत घरी वेळ घालवताना दिसत आहे.

4/8

लग्नानंतर नीलम गुलाबी साडीत खूपच सुंदर दिसते. ती तिचे सिंदूर आणि बांगड्या दाखवताना दिसत आहे. नीलम आणि सिद्धार्थ एकमेकांचे हात धरलेले आहेत. दोघांचेही हे हास्य त्यांचा आनंद स्पष्ट करत आहे.  

5/8

प्रियंका चोप्रा देखील तिच्या भावा आणि वहिनीसोबत पोज देताना दिसली. प्रियंका निळ्या रंगाच्या लेहेंग्यामध्ये खूपच सुंदर दिसत होती. तर निक महाराष्ट्रीयन लूकमध्ये खूपच हँडसम दिसत होता.

6/8

या फोटोमध्ये प्रियांकाची आई मधु चोप्रा आणि निक जोनासचे पालक देखील वधू-वरांसोबत पोज देताना दिसत आहेत. चोप्रा कुटुंबात नीलमचे भव्य स्वागत झाल्याचे फोटोवरून स्पष्ट होत आहे.

7/8

निकने मुलगी मालती आणि पत्नी प्रियांकासोबतचा फोटोही शेअर केला आहे. निकचे हास्य पाहून तुम्ही समजू शकता की तो प्रियांका आणि मुलीसोबत किती आनंदी आहे.

8/8

निक जोनासनेही वधू-वरांना त्यांच्या लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. त्याने लिहिले - 'माझ्या मेहुण्याला आणि वधूला अभिनंदन. तुमच्या आयुष्यात आनंद कायम राहो. आमचे कुटुंब वाढत आहे याचा मला खूप आनंद आहे.'