PVR INOXमध्ये अवघ्या 70 रुपयांत पाहा सिनेमा, कसे घ्यायचे सबस्क्रिप्शन? जाणून घ्या

PVR INOX Subscription: सोमवार ते गुरूवार दरम्यान सिनेमा पाहण्यासाठी तुम्ही हा सबस्क्रिप्शन पासपोर्ट वापरु शकता. यामध्ये तुम्हाला पीव्हीआरच्या आयमॅक्स, गोल्ड, लक्स आणि डायरेक्टर्स कट या प्रिमियम सर्व्हिसेस मिळणार नाहीत.

| Oct 15, 2023, 14:34 PM IST

 Movie 70 Rupees: सोमवार ते गुरूवार दरम्यान सिनेमा पाहण्यासाठी तुम्ही हा सबस्क्रिप्शन पासपोर्ट वापरु शकता. यामध्ये तुम्हाला पीव्हीआरच्या आयमॅक्स, गोल्ड, लक्स आणि डायरेक्टर्स कट या प्रिमियम सर्व्हिसेस मिळणार नाहीत.

1/8

PVR INOXमध्ये अवघ्या 70 रुपयांत पाहा सिनेमा, कसे घ्यायचे सबस्क्रिप्शन? जाणून घ्या

PVR INOX watch movie 70 Rupees subscription pass Details Marathi News

PVR Subscription Plan: अत्यंत कमी तिकिट दरात तुम्हाला आता पीव्हीआरमध्ये सिनेमा पाहता येणार आहे. पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेडकडून नुकतेच पीव्हीआर पासपोर्ट आयनॉक्स लॉन्च करण्यात आले आहे. याचे सबस्क्रिप्शन घेऊन तुम्ही महिन्याला 10 सिनेमा पाहू शकणार आहात

2/8

महिन्याच्या शुल्कात तुम्हाला 10 सिनेमे

PVR INOX watch movie 70 Rupees  subscription pass Details Marathi News

हा एक सब्सक्रिप्शन पास घेऊन महिन्याच्या शुल्कात तुम्हाला 10 सिनेमे पाहता येणार आहे. 16 ऑक्टोबर पासून मासिक सबस्क्रिप्शन प्लानची सुरुवात होत असून हा प्लान तुम्हाला अवघ्या 700 रुपयांमध्ये मिळणार आहे.

3/8

सबस्क्रिप्शन पासपोर्ट

PVR INOX watch movie 70 Rupees  subscription pass Details Marathi News

सोमवार ते गुरूवार दरम्यान सिनेमा पाहण्यासाठी तुम्ही हा सबस्क्रिप्शन पासपोर्ट वापरु शकता. यामध्ये तुम्हाला पीव्हीआरच्या आयमॅक्स, गोल्ड, लक्स आणि डायरेक्टर्स कट या प्रिमियम सर्व्हिसेस मिळणार नाहीत.

4/8

फूड कॉम्बो 99 रुपयांत

PVR INOX watch movie 70 Rupees  subscription pass Details Marathi News

पीव्हीआरने काही दिवसांपुर्वी खाद्यपदार्थ आणि पेयांच्या किमती 40 टक्क्यांनी कमी केल्या. यानंतर सोमवार ते गुरुवार सकाळी 9 ते संध्याकाळी 6 दरम्यान वाजवी किमतीचे फूड कॉम्बो 99 रुपयांना देण्याचा निर्णय घेतला.

5/8

तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शन

PVR INOX watch movie 70 Rupees  subscription pass Details Marathi News

PVR INOX पासपोर्ट' किमान तीन महिन्यांच्या सबस्क्रिप्शनसाठी घ्यावा लागणार आहे. अॅप किंवा वेबसाइटच्या माध्यमातून हे सबस्क्रिप्शन घेता येईल. 

6/8

चेक आउटच्या वेळी पेमेंट

PVR INOX watch movie 70 Rupees  subscription pass Details Marathi News

सबसक्रिप्शन रिडीम करण्यासाठी युजर्सना चेक आउटच्या वेळी पेमेंट पर्याय म्हणून पासपोर्ट कूपन निवडावे लागेल.

7/8

पासपोर्ट कूपन

PVR INOX watch movie 70 Rupees  subscription pass Details Marathi News

एकापेक्षा अधिक तिकिट खरेदी केलात तर एक तिकीट पासपोर्ट कूपन वापरून रिडीम करुन उर्वरित पैसे दिले जातील.

8/8

आधार कार्डसोबत बाळगा

PVR INOX watch movie 70 Rupees  subscription pass Details Marathi News

'पासपोर्ट' वापरून चित्रपट बघायचा असेल तर तुमचे आधार कार्डसोबत बाळगावे लागेल. पीव्हीआरने दिलेला हा 'पासपोर्ट' इतर कोणाला हस्तांतरीत करता येणार नाही.