PHOTO : 80 च्या दशकात बायकोला घटस्फोट न देता दुसरं लग्न, 3 मुलांचा वडील, पण मुलगा करायचा राग...
Birthday Man Raj Babbar Affair Marriage: आज आपण अशा अभिनेत्याबद्दल बोलतोय, ज्याने चित्रपटात खलनायकाची भूमिका करुन जास्त प्रसिद्धी मिळवली. तर 80 च्या दशकात बायकोला घटस्फोट न देता त्याने दुसरं लग्न केलं होतं.
1/7

आम्ही बोलत आहोत राज बब्बर यांच्या आज 73 वा वाढदिवस साजरा करण्यात येतो. उत्तर प्रदेशातील तुंडला गावातील राज बब्बर यांनी आपल्या करिअरची सुरुवात थिएटरमधून केली. त्यानंतर त्यांना बॉलिवूडला अनेक चित्रपट मिळालीत. 80 च्या दशकात त्यांनी चित्रपटसृष्टीवर खरोखरच 'राज्य' केलं होतं असं म्हणण वावग ठरणार नाही. आज त्यांनी राजकारणात चांगल स्थान निर्माण केलंय.
2/7

80 च्या दशकात राज बब्बर नायक आणि खलनायक दोन्ही भूमिका चाहत्यांच्या पसंतीला उत्तर होती. त्यांचं शालेय शिक्षण आग्रामधील फैज-ए-आलम इंटर कॉलेजमधून झालं. त्यांना लहानपणापासूनच अभिनेता व्हायचं होतं. त्यामुळे त्यांनी 1975 मध्ये दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मध्ये प्रवेश घेतला. त्यांनी बॉलिवूडमध्ये 1560 हून अधिक चित्रपटांमध्ये काम दमदार भूमिका साकारली आहे. 1977 मध्ये रिलीज झालेला 'किस्सा कुर्सी का' हा त्यांचा पहिला चित्रपट होता.
3/7

पण राज यांना खरी ओळख मिळाली ती 'इन्साफ का तराजू' या चित्रपटातून. या चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रदर्शित होताच, राज बब्बर दिग्दर्शक बीआर चोप्राचा आवडता नायक बनला. 80 च्या दशकात राज एक असा अभिनेता होता जो खलनायकापासून नायकापर्यंत सर्व पात्रांमध्ये सहज करायचा. 'प्रेम गीत', 'उमराव जान', 'निकाह', 'अगर तुम ना होते', 'मजदूर', 'मेहंदी', 'आज की आवाज', 'हकीकत', 'सौ दिन सास के' या चित्रपट त्यांची अभिनय आजही मन जिंकतात. 'सलमा' 'कॉर्पोरेट', 'बॉडीगार्ड', 'कर्ज', 'फॅशन', 'साहेब बीवी और गँगस्टर 2', 'बुलेट राजा', 'तेवर' यांसारख्या चित्रपटांतून त्यांचा अभिनयाच कौतुक होतं.
4/7

चित्रपटांप्रमाणेच राज बब्बरच्या वैयक्तिक आयुष्याचीही तेवढंच चर्चिल गेलं. कारण त्यांनी हिंदू असून दोन लग्न केली होती. 80 च्या दशकात त्यांचं विवाहबाह्य संबंध होते. 80 च्या दशकातील अतिशय सुंदर अभिनेत्री स्मिता पाटील हिच्यावर त्यांचं इतकं प्रेम होतं की त्यांनी त्या काळात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे राज बब्बर आणि स्मिता पाटील यांना समाजाच्या अनेक टीकांचा सामना करावा लागला. पण त्यांनी कसलीही पर्वा न करता प्रेमाला प्राधान्य दिलं.
5/7

6/7

हिंदू धर्मानुसार पहिली पत्नी जिवंत असताना दुसरा विवाह करता येत नाही. पण तरीदेखील आपल्या पहिल्या पत्नी नादिराला घटस्फोट न देता, राज यांनी 1983 मध्ये स्मिता पाटील यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर काही वर्षांनी त्यांचा मुलगा प्रतीक बब्बरचा जन्म झाला मात्र स्मिता पाटील यांचं 13 डिसेंबर 1986 ला मुलाला जन्म दिल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांनी निधन झालं. स्मिताच्या मृत्यूनंतर राज पुन्हा त्याची पहिली पत्नी नादिराकडे परतले. नादिरा आणि राज यांची जुही आणि आर्या ही मुलं आहेत.
7/7
