Rang Panchami Wishes In Marathi : रंगपंचमीच्या खास मराठीतून शुभेच्छा, घ्या रंगांचा आनंद

Rang Panchami Wishes In Marathi :  होळीच्या पाचव्या दिवशी तिथीनुसार रंगपंचमीचा सण साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रातील काही भागासह मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. रंगपंचमीला देव पृथ्वीतलावर होऊन रंग गुलालाची उधळण करतात अशी मान्यता आहे. अशा या रंगपंचमीच्या तुमच्या प्रियजनांना द्या रंगबेरंगी खास मराठीतून शुभेच्छा 

Mar 28, 2024, 12:36 PM IST
1/7

 ''लाल” रंग तुमच्या गालांसाठी, “काळा” रंग तुमच्या केसांसाठी, “निळा” रंग तुमच्या डोळ्यांसाठी, “पिवळा” रंग तुमच्या हातांसाठी, “गुलाबी” रंग तुमच्या होठांसाठी, “सफेद” रंग तुमच्या मनासाठी, “हिरवा” रंग तुमच्या आरोग्यासाठी, होळीच्या या सात रंगांसोबत, तुमचे जीवन रंगून जावो.. रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा…  

2/7

क्षणभर बाजूला सारू रोजच्या वापरातले वाईट क्षण, रंग गुलाल उधळू आणि, रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण.. रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा…!  

3/7

 रंगून जाऊ रंगात आता, अखंड उठु दे मनी तरंग.. तोडून सारे बंध सारे, असे उधळुया आज हे रंग.. हि होळी तुम्हा सर्वांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो…. रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा…!  

4/7

एका बाजूला कृष्ण सावळा, दुसऱ्या बाजूला राधिका गोरी, जणूकाही एकमेकांत सामावलेले तो चंद्र आणि ही चकोरी, रंगपंचमीच्या शुभेच्छा..  

5/7

रंगात होळीच्या रंगूया चला, स्नेहाच्या तळ्यात डूंबूया चला.. रंग सारे मिसळूया चला, रंग रंगांचा विसरुया चला.. सोडूनी भेद नी भाव, विसरुनी दुःखे नी घाव, प्रेमरंग उधळूया चला… रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा….  

6/7

 वसंत ऋतू फुलला आज साजणीच्या मनी रंगांची उधळण तिच्यावर सजणाच्या अंगणी प्रीतीची वेल फुलली गातो आम्ही गाणी चिंब भिजू दे आज रंगपंचमीची राणी रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा….  

7/7

भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद, अखंड उडू दे मनि रंगतरंग व्हावे अवघे जीवन दंग असे उधळू आज हे रंग! रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा