दिग्दर्शकाचा सतत प्रयत्न, पण समांथाने 'ते' काम करण्यास दिला नकार, शेवटी....

समांथा रुथ प्रभूला (Samantha Ruth Prabhu) अल्लू अर्जूनची मुख्य भूमिका असणाऱ्या (Allu Arjun) 'पुष्पा' चित्रपटातील 'ऊ अंतवा' (Pushpa song Oo Antava) गाण्यामुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. चित्रपटातील हे आयटम साँग संपूर्ण देशभरात प्रसिद्ध झालं होतं.  मात्र आता समांथा असे आयटम साँग पुन्हा करणार नसल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समांथाला पुष्पाच्या सीक्वेलमध्ये (Pushpa Seque) एक आयटम नंबर करण्यासाठी ऑफर देण्यात आली आहे. पण आता समांथाला आयटम साँग करण्यात कोणताही रस नाही.   

Feb 16, 2023, 11:48 AM IST
1/5

OTTPlay.com च्या रिपोर्टनुसार, समांथाला पुष्पाच्या दिग्दर्शकाने सिक्वेलमध्ये आयटम नंबर करण्याची ऑफर केली आहे. पण समांथाने ही ऑफर स्वीकारण्यास नकार दिला आहे. इतकंच नाही तर समांथाला चित्रपटाशी जोडलं जाण्यासाठी एक छोटी भूमिकाही ऑफर करण्यात आली आहे. पण समांथा करिअरच्या अशा टप्प्यावर पोहोचली आहे, जिथे ती आयटम साँग करण्यास नकार देत आहे.   

2/5

दरम्यान पुष्पा 2 चे निर्माते समांथाला मनवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच दुसरीकडे गाण्यासाठी दुसऱ्या एखाद्या अभिनेत्रीचा शोधही घेतला जात आहे. याआधी मिळालेल्या माहितीनुसार, समांथाने तीन मिनिटांच्या गाण्यासाठी 5 कोटी घेतलेहोते. या गाण्यासाठी अल्लू अर्जूनने स्वत: तिला विनंती केली होती. पण समांथा आता आयटम साँग करण्यास इच्छुक नसून यामागील कारणाचा खुलासा केलेला नाही.   

3/5

पुष्पामधील आयटम साँगनंतर समांथाला ट्रोलही करण्यात आलं होतं. अशा प्रोजेक्टमुळेच तिचं लग्न तुटल्याचंही बोललं जात आहे. समांथाने 'फॅमिली मॅन' वेब सीरिजमध्ये काही बोल्ड सीन्स दिले होते तसंच नंतर पुष्पा चित्रपटात आयटम साँग साइन केलं होतं. नागा चैतन्यचा समांथाने असे प्रोजेक्ट करण्यास विरोध होता.   

4/5

दरम्यान एका मुलाखतीत समांथाने पुष्पा गाण्याला मिळालेल्या प्रतिसादावर आनंद व्यक्त केला होता. "लोक मला किती प्रेम देत आहेत हे मी शब्दांत सांगू शकत नाही. हे गाणं इतकं हिट होईल याची मला कल्पना नव्हती. लोक आता माझे चित्रपट विसरले असून या गाण्यासाठी ओळखत आहेत," असं समांथाने सांगितलं होतं.   

5/5

समांथा प्रभू सध्या दुर्मिळ अशा मायोजिटिस आजाराचा सामना करत आहे. पण तिने कामातून ब्रेक घेतलेला नाही. तसंच आजारातून बरं होण्यासाठी उपचारही घेत आहे.