'मी म्हातारपण पाहू शकणार नाही', 'या' बॉलिवूड सुपरस्टारने त्याच्या मृत्यूची अगोदरच केली होती भविष्यवाणी

Sanjeev Kumar Birth Anniversary : हा एक असा अभिनेता होता जो तरुणपणातच वृद्धापळातील भूमिका साकारायचा. यामागील कारणही विचित्र होतं. कारण तो कायम म्हणायचा मी म्हातारपण पाहू शकणार नाही. 

| Jul 09, 2024, 15:42 PM IST
1/7

या अभिनेत्याने आपल्या मरण्याची भविष्यवाणी केली होती. त्याने सांगितलं म्हटलं होतं की, 50 वर्षांचा होण्यापूर्वीच त्याला मृत्यू गाठणार आहे. हेच कारण होतं की त्याने लग्नही केलं नाही. 

2/7

आम्ही बोलत आहोत दिग्गज अभिनेते संजीव कुमार यांच्याबद्दल. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, त्यांची मृत्यूची भविष्यवाणी खरी ठरली. 

3/7

संजीव कुमार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला 'मौसम', 'नौकार', 'नया दिन नई रात', 'पती-पत्नी और वो', 'अंगूर' आणि 'शोले' सारखे अनेक चमकदार आणि सुपरहिट चित्रपटात अभिनय केलाय.  

4/7

त्याकाळात सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेताही संजीव कुमार होता. खरं तर एका मुलाखतीत संजीव कुमार त्यांना विचारण्यात आलं होतं की, तुम्ही वयापेक्षा ज्येष्ठ नागरिकांच्या भूमिका का करता. त्यांनी दिलेलं उत्तर ऐकून त्यावेळी सगळेच थक्क झाले होते. 

5/7

'ते म्हणाले की, मी माझं म्हातारपण कधीच पाहू शकणार नाही. त्यांना एका ज्योतिषाने सांगितलं होतं की, त्यामुळे मी ते परद्यावर जगून घेतो.' त्यांच्या कुटुंबातील पुरुषांना एक शाप दिला होता. ते 50 वर्षांपर्यत जगू शकणार नाहीत. वयाच्या 47 व्या वर्षीचं हृदयविकाराने निधन झालं. 

6/7

करिअरमध्ये शिखरावर असणारे संजीव कुमार यांचं प्रेम जीवन उदास होतं. संजीव कुमार यांनी ड्रीम गर्ल हेमा मालिनीच्या प्रेमात पडले होते. हेमा मालिनीसोबत लग्न करण्याची संजीव कुमार यांची इच्छा होती. 

7/7

संजीव कुमार यांनी हेमा मालिनी यांच्या आईला लग्नाचा प्रस्ताव पाठवला होता. पण हेमा मालिनी यांच्या आईने लग्नाचा प्रस्तावला नकार दिला. हेमा मालिनी त्यावेळी धर्मेंद्र यांच्या प्रेमात वेड्या होत्या. काही वेळानंतर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी लग्न केलं.