सारा की सना? सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्यापैकी कोणाच्या मुलीचं शिक्षण जास्त?

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर की सौरव गांगुलीची मुलगी सना गांगुली यांच्यात कोणाचं शिक्षण जास्त?  

| Jan 03, 2025, 20:50 PM IST
1/7

नेहमी चर्चेत

सारा तेंडुलकर आणि सना गांगुली या नेहमी सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. 

2/7

शैक्षणिक पात्रता

आज आम्ही तुम्हाला सारा तेंडुलकर आणि सना गांगुली यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल सांगणार आहेत. जाणून घेऊयात सविस्तर 

3/7

वय

भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरचे वय 27 वर्ष आहे. तर भारताचा क्रिकेटपटू सौरव गांगुलीची मुलगी सना गांगुली ही 33 वर्षांची आहे.   

4/7

साराचे शिक्षण

साराने तिचे प्राथमिक शिक्षण प्रसिद्ध धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून घेतलं आहे. त्यानंतर साराने लंडनमध्ये तिचा शैक्षणिक प्रवास सुरू केला, जिथे ती उच्च शिक्षण घेतलं आहे. 

5/7

संचालक

खरं तर, साराने तिची आई अंजली तेंडुलकर हिच्यासारखा करियर मार्ग निवडला आहे. फॅशन आणि मॉडेल असलेली सारा सचिन तेंडुलकर फाउंडेशनची संचालक देखील आहे.

6/7

सना गांगुली शिक्षण

सना गांगुलीने तिचे शालेय शिक्षण कोलकात्याच्या लोरेटो हाऊस स्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर तिने युनिव्हसिर्टी कॉलेज लंडन येथून अर्थशास्त्रात पदवी घेतली. 

7/7

INNOVERV

सध्या सना तिच्या Linkedln प्रोफाइलनुसार INNOVERV येथे सल्लागार म्हणून काम करते. त्यासोबतच तिने मॉर्गन स्टॅनले येथे तिच्या कौशल्यांचे योगदानही दिले आहे.