आपल्या महाराष्ट्रात आहे आशिया खंडातील सर्वात उंच धबधबा! साताऱ्यातील वजराई भांबवली... एक थरारक अनुभव

हा धबधबा सरळ उभ्या दगडावरून तीन टप्प्यात कोसळतो. 

वनिता कांबळे | Jul 10, 2024, 18:33 PM IST

Satara Bhambavli Vajrai Waterfall :  निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेल्या सातारा जिल्ह्यात अनेक धबधबे सध्या ओसंडून वाहत आहेत.आशिया खंडातील सर्वत उंच धबधबा म्हणून ओळख असणारा वजराई भांबवली धबधबा देखील कोसळू लागला आहे. पर्यटक येथे मोठ्या संख्यने येत आहेत. 

1/7

साताऱ्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कास तलावापासून जवळच असलेल्या सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगांमधून हा धबधबा कोसळतो.  

2/7

भांबवली पासून पुढे चिरा दगडाचा पायऱ्या आहेत. काही ठिकाणी जंगलातुन पायी प्रवास करावा लागतो .

3/7

या धबधब्याच्या ठिकाणी पोहचण्यासाठी साताऱ्याहून  कास आणि पुढे भांबवलीपर्यंत वाहनाने जाता येते. यानंतर मात्र 2 किलोमीटरचा पायी प्रवास सुरु होतो.  

4/7

घनदाट झाडी,दाट धुके आणि आभाळातून कोसळणारा जोराचा पाऊस असे वातावरण या ठिकाणी असतं. 

5/7

या ठिकाणी निसर्गाची मुक्त हस्ताची उधळण पाहून स्तब्ध होण्याला होते. अनेक छोटे मोठे धबधबे या ठिकाणी आपणास पाहायला मिळतात.

6/7

वजराई भांबवली तीन टप्प्यात धबधबा कोसळतो. हा भारतातील सर्वात उंच आणि सुंदर धबधबा आहे.

7/7

वजराई म्हणजेच भांबवली धबधब्याची उंची 1840 फूट इतकी आहे.