Smartphone Safety Tips: तुम्ही स्मार्टफोन वापर आहात ! या उपयुक्त 5 टीप्स करा आजपासूनच फॉलो

मोबाईल फोन (Mobile Phone) आता आपल्या आयुष्याचा एक भाग बनला आहे. अशा परिस्थितीत, त्याच्या वापराशी संबंधित सावधगिरी अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची दुर्घटना किंवा अडचणी टाळण्यासाठी आपण आपल्या स्तरावर काही काळजी घेणे आवश्यक आहे.

Surendra Gangan | Nov 18, 2022, 11:40 AM IST

Smartphone Safety Tips: तुम्ही स्मार्टफोनचा वापर करताना काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी काही टीप्स उपयुक्त आहेत. या टीप्स आजपासूनच फॉलो करा आणि अनेक धोके टाळा. स्मार्टफोन (Smarphone) आजकाल प्रत्येक घरात आहे आणि आपण सर्वजण त्याचा वापर करतो. मोबाईलच्या वापरासंबंधी काही खबरदारी आहेत, ज्या प्रत्येकाने पाळल्या पाहिजेत. त्यामुळे तुमच्यासाठी ते चांगले राहणार आहे.

1/5

1. पैशांच्या व्यवहारांसाठी ठेवा अ‍ॅप्सची बायोमेट्रिक्स सुरक्षा

1. पैशांच्या व्यवहारांसाठी ठेवा अ‍ॅप्सची बायोमेट्रिक्स सुरक्षा

1. पैशांच्या व्यवहारांसाठी ठेवा अ‍ॅप्सची बायोमेट्रिक्स सुरक्षा : आपल्यापैकी बरेच जण ऑनलाइन बँकिंग, पेमेंट इत्यादीसाठी अनेकदा स्मार्ट फोनचा वापर करतात किंवा करत आहेत. अशा अ‍ॅप्लिकेशनसाठी बायोमेट्रिक सुरक्षा वापरल्यास ते अधिक चांगले होईल.

2/5

2. ओव्हरहीटिंग होत नाही हे लक्षात ठेवा

2. ओव्हरहीटिंग होत नाही हे लक्षात ठेवा

2. ओव्हरहीटिंग होत नाही हे लक्षात ठेवा  : आपल्या फोनची बॅटरी संपली की आपण चार्जिंगसाठी लावतो. किंवा जास्त बोलताना फोन गरम होतो. ज्यावेळी चार्जिंगसाठी फोन लावताना तो जास्त गरम होणार नाही याची काळजी घ्या. मोबाईल फोन चार्ज झाला तरी अनेकजण तो काढून ठेवण्याचे विसरतात. कधी कधी रात्री झोपताना ते तसाच ठेवतात आणि सकाळपर्यंत तो चार्जिंगला राहतो. अनेक वेळा चार्जिंग करताना फोन इतका गरम होतो की तुम्ही तो धरू शकत नाही. अशा स्थितीत फोनचा स्फोटही होऊ शकतो आणि अशा काही घटना घडल्या आहेत. म्हणूनच नेहमी जास्त गरम होणार नाही याची काळजी घ्या. 

3/5

3. आवश्यक असेल तेव्हाच लोकेशन ऑन करा

3. आवश्यक असेल तेव्हाच लोकेशन ऑन करा

3. आवश्यक असेल तेव्हाच लोकेशन ऑन करा  : आवश्यक असेल तेव्हाच लोकेशन शेअरिंग वापरा. लोकेशन सामायिकरण हे एक चांगले वैशिष्ट्य आहे, परंतु त्याचा गैरवापर देखील होऊ शकतो. म्हणून, आवश्यक नसताना लोकेशन शेअर करु नका. ते बंद ठेवण्याचा प्रयत्न करा. 

4/5

4. झोपण्यापूर्वी फोन पाहणे डोळ्यांसाठी घातक

4. झोपण्यापूर्वी फोन पाहणे डोळ्यांसाठी घातक

4. झोपण्यापूर्वी फोन पाहणे डोळ्यांसाठी घातक  : झोपण्यापूर्वी फोन स्क्रीन पाहणे डोळ्यांसाठी चांगले नाही. स्मार्ट फोनचा जास्त वापर डोळ्यांसाठी चांगला नाही. त्यामुळे डोळ्यांत पाणी येणे, डोकेदुखी, डोळे दुखणे यासारख्या समस्या निर्माण होतात. झोपण्यापूर्वी बराच वेळ मोबाईल स्क्रीन पाहिल्यानेही झोप येण्यास त्रास होतो. 

5/5

5. फक्त सुरक्षित Apps डाऊनलोड करा

5. फक्त सुरक्षित Apps डाऊनलोड करा

5. फक्त सुरक्षित Apps डाऊनलोड करा  : फक्त सुरक्षित अ‍ॅप्स डाउनलोड करा. स्मार्टफोनमध्ये दररोज नवीन अ‍ॅप्लिकेशन्स डाऊनलोड करण्याच्या जाहिराती येतात. लक्षात ठेवा की सर्व अ‍ॅप्स सुरक्षित नाहीत. कोणतेही अ‍ॅप्लिकेशन नीट तपासल्यानंतरच डाऊनलोड करा.