धक्कादायक : Beauty Queen च्या मंचावर वाद, डोक्यावर खेचून काढला विजयाचं क्राऊन

Apr 07, 2021, 07:36 AM IST
1/5

मंचावरच वाद

मंचावरच वाद

कोलंबो: श्रीलंकेत ब्युटी कॉन्टेस्टच्या दरम्यान विजेती Mrs World बाबत मंचावरच वाद निर्माण झाला. मिसेस श्रीलंकेचं किताब घातल्यानंतर अचानक विजेतीचं नाव बदलण्यात आलं. एवढंच नव्हे तर मंचावरच मिसेस वर्ल्डने श्रीलंकेच्या ब्युटी क्विनचं ताज डोक्यावरून काढून टाकलं. रनर अपला हा मान देऊन तिला विजेती घोषित करण्यात आलं.

2/5

विवाहित आयुष्यावर प्रश्नचिन्ह

विवाहित आयुष्यावर प्रश्नचिन्ह

श्रीलंकेत मिसेस श्रीलंका करता निवड झालेल्या पुष्पिका डी सिल्वावर आरोप लावण्यात आले. हे आरोप असे होते की, घटस्फोट घेतला असून त्यांचं वैवाहिक आयुष्य संपलेलं आहे. ज्यामुळे त्यांना या स्पर्धेच विजेतेपद मिळणार नाही.

3/5

झटापटीत डोक्याला लागला मार

झटापटीत डोक्याला लागला मार

या दरम्यान मिसेस वर्ल्डने आपल्या डोक्यावरून विजयाचा ताज काढला. तिने मंचावरच रनर अपला विजेती घोषित केलं. या घटनेने मिसेस श्रीलंका घोषित झालेल्या पुष्पिका डी सिल्वाने सांगितलं की, आपल्या डोक्याला दुखापत झाली असून कारवाईची मागणी केली आहे.

4/5

फेसबुक पोस्टवर मांडली व्यथा

फेसबुक पोस्टवर मांडली व्यथा

पुष्पिका डी सिल्वाने या सर्व घटनेनंतर फेसबुक पोस्ट लिहिली आहे. नेमकं त्या दिवशी काय घडलं हे सांगितलं. मला माहित आहे तुम्ही अप्रत्यक्षरित्या त्या घटनेवर माझी प्रतिक्रिया जाणू इच्छिता. सांगायला बरंच आहे पण एवढंच सांगेन. माझ्याबद्दल ज्या अफवा पसरत आहेत. त्या चुकीच्या आहेत. त्या घटस्फोटीत नाहीत. मात्र हे खरं आहे की त्या आपल्या नवऱ्यासोबत राहत नाहीत.

5/5

मिसेज वर्ल्डच्या आयोजकांनी मागितली माफी

मिसेज वर्ल्डच्या आयोजकांनी मागितली माफी

मिसेज वर्ल्डच्या आयोजकांनी माफी मागितली आणि पुष्पिका डी सिल्वा यांच्यासोबत जे काही घडलं त्यासाठी माफी मागितली आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला आहे.