दिवसभर उपाशी राहताय? आरोग्यासाठी ठरु शकते घातक

बहुतेक वेळा लोक वजन कमी करण्यासाठी किंवा पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपाशी राहतात . पण तुम्हाला हे माहित आहे का असे केल्याने आरोग्यासंबंधित अनेक आजार होऊ शकतात. 

Jul 26, 2024, 13:53 PM IST
1/6

जास्त वेळ उपाशी राहिल्याने शरीरात ऊर्जेची कमतरता भासते. यामुळे अशक्तपणा आणि थकवा येऊ शकतो. 

2/6

अनेकवेळा उपाशी राहिल्याने अशक्तपणा आणि चक्कर येऊ शकते. त्यामुळे उपाशी राहणे टाळावे.   

3/6

त्याचप्रकारे उपाशी राहिल्याने रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते. 

4/6

जास्त वेळ उपाशी राहिल्याने लोकांना गॅस, अॅसिडिटी, पोट फुगणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. 

5/6

जास्त वेळ उपाशी राहणे न्यूरोलॉजिकल फंक्शन्सवर परिणाम करते.

6/6

अनेकजण सकाळचा नाश्ता न करता थेट दुपारचे जेवण करतात. यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढू लागते. तसेत शरीरातील इतर भागांमध्ये चरबी जमा होऊ लागते. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे.  'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)