हवेत उडणाऱ्या Maruti आणि Hyundai ला Tata ने चारली धूळ
Car Sales: फेब्रुवारी 2023 मध्ये मारुतीच्या (Maruti) 8.47 टक्के गाड्यांची विक्री झाली आहे, तर ह्युंदाईच्या (Hyundai) 1.8 टक्के आणि टाटा मोटर्सच्या 14.42 टक्के वाहन विक्रीची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत टाटा मोटर्सने (Tata Motors) मारुती आणि ह्युंदाईला मागे टाकलं आहे.
1/6
टाटा मोटर्सच्या चांगल्या कामगिरीमागे नेक्सॉन आणि पंच या गाड्यांचं मोठं योगदान आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये या दोन्ही कार कंपनीच्या बेस्ट सेलर कार ठरल्या आहेत. यासोबतच देशातील टॉप-10 सर्वाधिक विकल्या जाणार्या कारमध्येही नेक्सॉन आणि पंचचा समावेश करण्यात आला आहे. एवढेच नाही तर देशातील टॉप-5 सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्हीमध्ये नेक्सॉन आणि पंचचाही समावेश आहे.
2/6
3/6
विक्रीच्या प्रमाणात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या टाटा मोटर्सची फेब्रुवारी 2023 मध्ये 38,965 युनिट्सची किरकोळ विक्री झाली, जी फेब्रुवारी 2022 मध्ये विकल्या गेलेल्या 34,055 युनिट्सपेक्षा जास्त आहे. वार्षिक आधारावर त्याची विक्री वाढीचा दर 14.42 टक्के आहे. म्हणजेच त्याची विक्री 14.42 टक्क्यांनी वाढली आहे.
4/6
फेब्रुवारी 2023 मध्ये, मारुती सुझुकीने 1,18,892 युनिट्सची विक्री केली, तर फेब्रुवारी 2022 मध्ये, 1,09,611 युनिट्सची विक्री झाली. याचा अर्थ वार्षिक आधारावर विक्री वाढीचा दर 8.47 टक्के राहिला आहे. त्याचवेळी, फेब्रुवारी 2023 मध्ये विक्रीच्या प्रमाणात दुसऱ्या स्थानावर असलेल्या Hyundai ने फेब्रुवारी 2022 मध्ये 38,688 युनिट्सच्या तुलनेत 39,106 युनिट्सची विक्री केली आहे. म्हणजेच त्याचा विक्री वाढीचा दर एकूण 1.08 टक्के राहिला आहे.
5/6
6/6