Tax Saving Tips: तुमची गुंतवणूक ठरु शकतो Tax बचतीसाठीचा बेस्ट ऑप्शन... जाणून घ्या
Tax Savings Tips: तुम्ही नोकरी करत असाल आणि तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर सरकारच्या या योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकतील. या योजनांमध्ये केलेल्या गुंतवणूकीमुळे तुम्हाला टॅक्समध्ये देखील मोठी सूट मिळू शकते. कोणत्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला जास्त फायदा मिळू शकतो, जाणून घ्या...
1/6
Public Provident Fund (PPF)
टॅक्स वाचवण्यासाठी आणि सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करताना PPF हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो. या योजनेअंतर्गत, कोणताही गुंतवणूकदार एका वर्षात किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकतो. PPF वर वार्षिक 7.1 टक्के व्याजदर आहे. या योजनेची खास बाब म्हणजे गुंतवणुकीचे पैसे, गुंतवणुकीच्या पैशावर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम या सर्व गोष्टी टॅक्स फ्री आहेत.
2/6
Sukanya Samriddhi Yojana (SSY)
या योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराला 7.6 टक्के व्याज मिळतं. या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या मुलीच्या खात्यात वार्षिक 250 ते 1.5 लाख रुपये जमा करू शकता. या योजनेमध्ये 14 वर्षे पैसे जमा केले जातात. मुलगी 21 वर्षांची झाल्यावर गुंतवणूकदाराला पूर्ण व्याजासह पैसे परत मिळतात. या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असावे.
3/6
Fixed Deposit (FD)
4/6
Senior Citizens’ Savings Scheme (SCSS)
5/6
National Pension System (NPS)
NPS ही सरकारी सेवानिवृत्ती बचत योजना आहे. यामध्ये 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची बचत करण्यासोबतच 50,000 रुपयांपर्यंतचा फायदा घेता येईल. म्हणजेच, NPS मध्ये गुंतवणूक करून तुम्ही एकूण 2 लाख रुपयांची आयकर सूट घेऊ शकता. तुम्ही यामध्ये महिन्याला रु 1,000 पासून गुंतवणूक सुरू करू शकता. 18 ते 65 वर्षे वय असलेला कोणताही भारतीय नागरिक या योजनेत अकाउंट उघडू शकतो.
6/6