Teeth Whitening Tips : दातांचा पिवळेपणा जात नाही? करा 'हे' घरगुती उपाय

Teeth Whitening Tips : चेहरा सुंदर दिसावा म्हणून आपण काय काय करतो. पण बरेच लोक हे फक्त चेहऱ्याकडे लक्ष देतात. फक्त नाही तर चेहऱ्यासोबत आपले दात देखील सुंदर दिसणे महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा आपण सगळ्यांसमोर हसतो तेव्हा सगळ्यात आधी सगळ्यांचे लक्ष हे आपल्या दातांकडे जाते. त्यामुळे आपल्या समोर असलेल्या व्यक्तींसमोर आपलं खूप वाईट इम्प्रेशन पडू शकतं. पण तुम्हाला दात घाण होण्याची कारण माहित आहेत का? आज आपण दात घाण होण्याची कारण आणि त्यासोबत दात कसे साफ करावे हे जाणून घेऊया...

| Apr 23, 2023, 18:19 PM IST
1/7

ऑईल पुलिंग (Oil Pulling)

Teeth Whitening Tips

नारळचा तेल, तिळाचं तेल किंवा मग सूर्यफुलाचं या तेलापैकी कोणत्याही तेलाचा एक चमचा तुमच्या तोंडात ठेवा आणि त्यानंतर त्यानं गुळण्या करा. गुळण्या करताना अशा प्रकारे करा जेणेकरून ते तेल तुमच्या दातांना लागेल. 

2/7

कडुलिंब (Neem)

Teeth Whitening Tips

कडुलिंबात औषधी गुणधर्म आहेत हे सगळ्यांना माहित आहे. दररोज कडुलिंबाच्या छोट्या काठीनं दात घासल्यात फक्त तोंडातून येणाऱ्या दुर्गंधी पासून सुटका मिळणार नाही तर दात पांढरे देखील होतील. त्यासोबत कॅव्हिटीपासून सुटका मिळेल.

3/7

बेकिंड सोडा (Baking Soda)

Teeth Whitening Tips

पिवळे दात स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा, मीठ आणि नारळाचे तेल मिक्स करा. मग ब्रश किंवा बोटानं दात घासून घ्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पेस्ट महिन्यातून दोन वेळा वापरा. जास्त प्रमाणात वापरल्यास तुम्हाला त्रास होऊ शकतो. 

4/7

संत्र्याची साल (orange peel)

Teeth Whitening Tips

दात पांढरे करण्यासाठी तुम्ही संत्र्याची साल, टोमॅटो आणि मीठ या तिघांचे मिश्रण करा. त्यानंतर त्याची पेस्ट टूथब्रशवर लावून दात घासा. मग पुन्हा एकदा टुथपेस्टनं साफ करा. 

5/7

केळ्याचं साल (Banana Peel)

Teeth Whitening Tips

केळ्याचं साल वापरून तुम्ही दात पांढरे करू शकता. केळीच्या सालानं हलक्या हातानं दातांना मसाज कर त्यानं तुमचे दात पांढरे होतील.

6/7

जेवण झाल्यानंतर दात धुवा (gargling)

Teeth Whitening Tips

काही खाल्यानंतर दात घासण्यास वेळ नसेल तर गुळण्या करा. यामुळे दातात अडकलेलं अन्न बाहेर येत आणि दात किडत नाहीत. 

7/7

कशामुळे दात पिवळे होतात?

Teeth Whitening Tips

चहा, कॉफी, पान, सिगारेट, गुटखा, तंबाखू यांच्या वाईट व्यसनामुळे दात पिवळे दिसू लागतात. (All Photo : File Photo) (Disclaimer : दिलेली माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)