आषाढी एकादशीचा उत्साह; पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई
भेटीलागी जीवा लागलीसे आस ही एकच विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाची इच्छा मनात ठेवून वारकरी पंढरपुरात दाखल होत आहेत. दशमीच्या रात्री सगळ्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत.
Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिराचं शिखर, रुक्मिणी माता मंदिराच शिखर, संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडप, संत नामदेव महाद्वार, संत तुकाराम भवन, यासह संपूर्ण मंदिर रंगीबेरंगी आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे.

