मुंबईतील 300 वर्ष जुनी सुप्रसिद्ध माउंट मेरी जत्रा; 287 जादा बसेस सोडण्याचा 'बेस्ट' निर्णय

मुंबईत माउंट मेरी जत्रेचा उत्साह पहायला मिळत आहे. या जत्रेला नागिरिकांची मोठी गर्दी होते. 

Sep 09, 2023, 23:42 PM IST

mount mary fair : मुंबईतल्या सुप्रसिद्ध माउंट  मेरी जत्रेला 10 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या जत्रेसाठी बेस्टनेही 287 जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतलाय. जत्रेला भेट देणा-या भाविकांसाठी बेस्टने ही सेवा दिलीय.

1/7

माउंट  मेरीच्या जत्रेला ख्रिश्चन बांधवांसोबत इतर धर्मियांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. 

2/7

सुमारे 300 वर्षांपूर्वीपासून या जत्रेचे आयोजन करण्यात येत आहे.

3/7

वांद्रे (पश्चिम) येथील 100 हून अधिक वर्ष जुन्या माऊंट मेरी बेसलिका चर्चतर्फे दरवर्षी जत्रा भरविण्यात येते. ही जत्रा मुंबईकरांसाठी मोठे आकर्षण असते. 

4/7

 एक शतकाहून अधिक वर्षांची परंपरा असलेला हा उत्सव  सप्टेंबरच्या दुसऱ्या रविवारी सुरू होतो. 

5/7

वांद्रे स्टेशन परिसरातून नियमित बसमार्गावरही अतिरिक्त बस धावणार आहेत. 

6/7

वांद्रे रेल्वे स्टेशन ते हिल रोड दरम्यान या बस सोडण्यात येणार आहेत.   

7/7

10 सप्टेंबरपासून उद्यापासून ते 17 सप्टेंबरपर्यंत आठवडाभर बेस्टच्या जादा बसेस धावणार आहेत.