'या' बिया ठरतात पुरुषांसाठी वरदान; स्पर्म काऊंट वाढण्यासाठी फायदेशीर

भोपळ्याच्या बिया शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. दररोज खाल्ल्याने तुम्ही स्पर्म काऊंटची संख्या वाढवू शकता. जाणून घ्या भोपळ्याच्या बिया शुक्राणूंची संख्या वाढवण्यास कशी मदत करतात. एका संशोधनानुसार, एक चमचा भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने स्पर्म काऊंट वाढण्यास मदत होते.

Aug 15, 2023, 06:00 AM IST
1/5

भोपळ्याच्या बियांमध्ये फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, लोह यांसारखे अनेक पोषक घटक असतात. या बिया शुक्राणूंच्या संख्येबरोबरच शुक्राणूंची गुणवत्तेसाठीही फायदेशीर ठरतात.

2/5

भोपळ्याच्या बियांमध्ये फायटोस्टेरॉल घटक आढळतो. हे शरीरात टेस्टोस्टेरॉनचे उत्पादन करण्यास मदत करते. ज्यामुळे स्पर्म काऊंटची संख्या सुधारते.

3/5

भोपळ्याच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडंट असतात, जे स्पर्म काऊंट वाढवण्यासाठी चांगले मानले जातात.

4/5

भोपळ्याच्या बियांमधील अँटिऑक्सिडंट गुणधर्म शुक्राणूंना नुकसान होण्यापासून वाचवतात. 

5/5

शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी पुरुष दररोज एक चमचा भोपळ्याच्या बिया खाऊ शकतात. या बिया तुम्ही तळून घेऊ शकता किंवा स्मूदीमध्ये मिसळून खाऊ शकता. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)