Happy Birthday Tiger Shroff : टायगरचा Fitness मंत्रा.... Fit राहण्यासाठी रोज करतो वर्कआऊट आणि...
Tiger Shroff's Birthday Special : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. आज टायगरचा 33 (Tiger Shroff's 33th Birthday) वा वाढदिवस आहे. टायगरनं हीरोपंती या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्या चित्रपटात त्यानं केलेल्या स्टंट, अॅक्शन सीन्स आणि डान्स स्कीलनं प्रेक्षकांची मने जिंकली. टायगरला लहानपणापासून फुटबॉलचे वेड होते. मात्र, वडिलांसारखा तो देखील अभिनय क्षेत्रात आला. टायगरनं सुरुवातीपासून सगळे स्टंट हे स्वत: करण्यावर भर दिली आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याचा वर्कआऊट प्लॅन जाणून घेऊया...
![Tiger Shroff s Birthday Special know his fitness mantra](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/02/564460-tiger-shroff111.jpg)
![Tiger Shroff s Birthday Special know his fitness mantra](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/02/564459-tiger-shroff222.jpg)
![Tiger Shroff s Birthday Special know his fitness mantra](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/02/564458-tiger-shroff333.jpg)
![Tiger Shroff s Birthday Special know his fitness mantra](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/02/564457-tiger-shroff444.jpg)
![Tiger Shroff s Birthday Special know his fitness mantra](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/02/564456-tiger-shroff555.jpg)
डान्स करण्याविषयी बोलताना टायगर म्हणाला, डान्स करण्याची एक वेगळीच मज्जा आहे. कारण रोज ट्रेडमिलवर धावायला देखील कंटाळ येतो. त्यामुळे कधी तरी त्याऐवजी डान्स करण्यात मज्जा असते. त्यावेळी आपण गाणी ऐकतो आणि कधी कधी आपलं आवडतं गाणं असतं तर कधी आवडती कोरिओग्राफी... डान्स केल्यानंतर मी 1 ते 1.5 किलो वॉटर वेट कमी करतो.
![Tiger Shroff s Birthday Special know his fitness mantra](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/02/564455-tiger-shroff666.jpg)