भारतातील सर्वात श्रीमंत आहेत हे 10 कुटुंब, नेमकं करतात तरी काय? जाणून घ्या

Richest Families in India: भारतात अनेक मोठे कौटुंबिक व्यवसाय आहेत. त्यातील काहींचा तर जगातील सर्वात मोठ्या टॉप 50 कौटुंबिक व्यवसायांच्या यादीतही नंबर लागतो. पण भारतातील टॉप 10 सगळ्यात मोठे कौटुंबिक व्यवसाय कोणते आहेत हे तुम्हाला माहिती आहेत का? तर चला जाणून घेऊया ऑगस्ट 2024 पर्यंतचे भारतातील टॉप 10 कौटुंबिक व्यवसाय कोणते आहेत... 

Sep 18, 2024, 18:56 PM IST
1/10

अंबानी कुटुंब

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड हा भारतातील सर्वात मौल्यवान कौटुंबिक व्यवसाय आहे. हा व्यवसाय अंबानी कुटुंबाचा असून त्याचे मूल्य 25,75,100 कोटी रुपये इतके आहे. या व्यवसायात एनर्जी आणि टेलेकॉम सर्व्हिसचा समावेश आहे. अंबानींच्या दुसऱ्या पिढीद्वारे हा व्यावसाय सांभाळला जातो. 

2/10

बजाज कुटुंब

द बजाज ग्रुप हा भारतातील दुसरा सर्वात मौल्यवान कौटुंबिक व्यवसाय आहे. ज्याचे मूल्य 7,12,700 कोटी रुपये आहे. हा व्यवसाय ऑटोमोबाईल आणि ऑटो सेक्टरशी संबंधीत क्षेत्रातील आहे. हा व्यवसाय तिसऱ्या पिढीद्वारे सांभाळला केला जातो.

3/10

कुमार मंगलम बिर्ला कुटुंब

आदित्य बिर्ला ग्रुप कुटुंब हा भारतातील तिसरा सर्वात मौल्यवान कौटुंबिक व्यवसाय आहे. याचे मूल्य 5,38,500 कोटी रुपये इतके आहे.  

4/10

जिंदाल कुटुंब

JSW स्टील कुटुंब हा भारतातील चौथा सर्वात मौल्यवान कौटुंबिक व्यवसाय आहे आणि याचे मूल्य 4,71,200 कोटी आहे. 

5/10

नादर कुटुंब

HCL टेक्नोलॉजीज कुटुंब हे भारतातील टॉप 10 सर्वात मौल्यवान कौटुंबिक व्यवसायांपैकी एक आहे. ज्याचे मूल्य 4,71,200 कोटी इतके आहे. 

6/10

महिंद्रा कुटुंब

महिंद्रा अँड महिंद्रा कुटुंब हे भारतातील टॉप 10 सर्वात मौल्यवान कौटुंबिक व्यवसायांपैकी एक महत्त्वाचे नाव आहे. या व्यवसायाचे मूल्य 3,45,200 कोटी आहे.   

7/10

दाणी, चोक्सी आणि वकील कुटुंब

एशियन पेंट्स फॅमिली हे भारतातील सर्वात मौल्यवान कौटुंबिक व्यवसायांपैकी एक कुटुंब आहे. यांचे मूल्य 2,72,200 कोटी रुपये आहे. 

8/10

प्रेमजी कुटुंब

प्रेमजी यांचे विप्रो कुटुंब हे भारतातील मौल्यवान कौटुंबिक व्यवसायांपैकी एक असून या व्यवसायाचे मूल्य 2,57,900 कोटी रुपये इतके आहे. 

9/10

राजीव सिंग कुटुंब

DLF कुटुंब हे भारतातील टॉप 10 सर्वात मौल्यवान कौटुंबिक व्यवसायांपैकी एक नाव आहे आणि याचे मूल्य 2,04,500 कोटी इतके आहे. 

10/10

मुरुगप्पा कुटुंब

ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया हा मुरुगप्पा कुटुंबाचा व्यवसाय असून भारतातील टॉप 10 मौल्यवान कौटुंबिक व्यवसायांपैकी एक आहे. ज्याचे मूल्य 2,02,200 कोटी आहे.