Twins Born villages of India : येथे 400 हून अधिक जुळ्या मुलांचा जन्म, भारतातील अशी 5 आश्चर्यकारक गावे
Twins Born villages : भारतात अशी अनेक गावे आहेत, जी लोकांना आश्चर्यचकित करतात. येथे 400 हून अधिक जुळी मुले जन्माला आली आहेत.
Twins Born villages of India : भारतात अशी अनेक गावे आहेत, जी लोकांना आश्चर्यचकित करतात. भारतातील 5 गावांची ही अजब कहाणी जाणून घ्या. देशात अशी गावे आहे की, येथे 400 हून अधिक जुळी मुले जन्माला आली आहेत. तसेच एक गाव आहे जिथे दरवाजा नाही. भारतातील अशा आश्चर्यकारक गावांची माहिती जाणून लोक थक्क झाले आहेत. भारतीय गावे त्यांच्या पिकांसाठी, साक्षरता दर आणि स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहेत पण या बातमीत आम्ही तुम्हाला भारतातील अशा असामान्य गावांबद्दल सांगणार आहोत जे त्यांच्या अनोख्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत.
जुळ्यांचे गाव
![जुळ्यांचे गाव जुळ्यांचे गाव](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/09/09/520899-1310582-indian-village11.jpg)
केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात एक असे एक कोडिन्ही गाव आहे जे 'ट्विन टाउन' नावाने ओळखले जात आहे. जेथे जुळ्या मुलांचा जन्मदर कदाचित भारतातील सर्वात जास्त आहे. पहिल्या दृष्टीक्षेपात, कोडिन्ही अगदी सामान्य दिसते. केरळमधील इतर अनेक गावांप्रमाणे, ते नारळ ताड, कालवे आणि तांदळाच्या शेतांनी नटलेले आहे. पण जेव्हा तुम्ही त्याच्या अरुंद गल्ल्यांमध्ये खोलवर जाता तेव्हा तुम्हाला मोठ्या संख्येने एक सारखे चेहरे दिसतात. केरळमधील कोचीपासून सुमारे 150 किमी अंतरावर असलेल्या या मुस्लिम बहुल गावाची एकूण लोकसंख्या 2000 आहे आणि त्यापैकी 400 हून अधिक जुळी मुले आहेत. अशा परिस्थितीत या गावात आणि जवळच्या बाजारपेठेत तुम्हाला अनेक एकसारखे (सेम टू सेम) दिसणारी मुले बघायला मिळतील.
इथं घराला दरवाजाच नाही!
![इथं घराला दरवाजाच नाही! इथं घराला दरवाजाच नाही!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/09/09/520898-1310583-indian-village21.jpg)
तुम्ही अशा ठिकाणाची कल्पना करु शकता जिथे घरांना दरवाजे नसतात आणि तरीही स्थानिकांना कधीही असुरक्षित वाटत नाही? होय, याची कल्पना आजच्या जगात करणे खरोखर कठीण आहे, परंतु हे खरे आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात 'शनी शिंगणापूर' नावाचे एक छोटेसे गाव आहे, जिथे शनिदेवाची पाच फूट उंच मूर्ती संपूर्ण गावाचे रक्षण करते असे म्हणतात. येथे, गावकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे सुरक्षा प्रोटोकॉल टाळले आहेत आणि शतकानुशतके समोरच्या दरवाजाशिवाय राहत आहेत. अशी एक अख्यायिका सांगितली जाते की, रात्री गावच्या प्रमुखाला स्वप्नात भगवान शनी आलेत. त्यांनी मंदिर बांधण्याची आज्ञा दिली आणि त्या बदल्यात तो सर्वांचे रक्षण करत आहेत. त्यामुळे येथे घराला दरवाजे नसतात.
सध्या गावात सुमारे 60 करोडपती
![सध्या गावात सुमारे 60 करोडपती सध्या गावात सुमारे 60 करोडपती](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/09/09/520897-1310584-indian-village31.jpg)
अविरत संघर्ष आणि कष्टानंतर लोक अब्जाधीश किंवा करोडपती बनल्याच्या अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील, पण हिवरे बाजार या छोट्याशा गावाची गोष्ट वेगळी आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात वसलेले हे गाव एकेकाळी भारतातील इतर गावांसारखेच होते. 1972 मध्ये ते गरिबी आणि दुष्काळाच्या भीषणतेत होते. पण 1990 च्या दशकात, गावाचे नशीब अचानक बदलू लागले आणि पोपटराव बागूजी पवार नावाच्या ग्रामप्रमुखामुळे ते श्रीमंत गाव बनले. सध्या गावात सुमारे 60 करोडपती आहेत.
पहिले हरित गाव
![पहिले हरित गाव पहिले हरित गाव](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/09/09/520896-1310585-indian-village41.jpg)
खोनोमा हे भारतातील पहिले हरित गाव. आता ते खूप पुढे गेले आहे. 700 वर्षे जुनी अंगामी वस्ती आणि पूर्णपणे टेरेस्ड शेतजमिनी असलेले हे अनोखे गाव. भारत-म्यानमार सीमेवरील नागालँड राज्यातील हे स्वयंपूर्ण गाव आहे. नागालँडच्या आदिवासी गटांचे संरक्षण करण्याच्या इच्छेचा पुरावा आहे. त्यांनी त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण केले. गावातील सर्व शिकारींवर बंदी आहे, जे स्वत:च्या इको-फ्रेंडली झुम शेतीचा सराव करतात ज्यामुळे माती समृद्ध होते.
राजाचे कुटुंब म्यानमारमध्ये जेवते आणि भारतात झोपते
![राजाचे कुटुंब म्यानमारमध्ये जेवते आणि भारतात झोपते राजाचे कुटुंब म्यानमारमध्ये जेवते आणि भारतात झोपते](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/09/09/520894-1310586-indian-village51.jpg)