Uttarakhand ला जाण्याचा आहे प्लॅन, मग अल्मोडातील 'या' ठिकाणाला वेळ काढून भेट द्या

उत्तराखंड म्हटलं की सगळ्यांनाच आठवतो तो एकच शब्द आणि तो म्हणजे देवभूमी... उत्तराखंडला एकदा जाण्याची सगळ्यांचीच इच्छा असते. उत्तराखंड हे देशातील प्रमुख पर्यटन स्ठळांपैकी एक आहे. उन्हाळा असो, पावसाळा किंवा मग हिवाळा... कोणताही ऋतु असला तरी फिरायला जायचा बेत आखताना प्रत्येकाच्या डोक्यात येत उत्तराखंड... उत्तराखंडविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया...

Diksha Patil | Jun 23, 2023, 13:28 PM IST
1/7

अल्मोडा शहर

Uttarakhand travel tips

उत्तराखंडमधील जास्त लोकांन न माहित असलेलं स्थळ म्हणजे अल्मोडा. आज आपण अल्मोडाविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया... (Photo Credit : Social Media)  

2/7

जोगेश्वर मंदिर

Uttarakhand travel tips

अल्मोडापासून 30 किलोमीटर अंतरावर 7व्या शतकात बांधलेले जोगेश्वर मंदिर आहे. गंगा नदीच्या काठावर वसलेले जागेश्वर मंदिर देवदार, ओक आणि रोडोडेंड्रॉनच्या फुलांनी वेढलेले आहे. (Photo Credit : Social Media)

3/7

गोविंद वल्लभ पंत संग्रहालय

Uttarakhand travel tips

जर तुम्हाला इतिहास आवडत असेल तर तुम्ही या संग्रहालयाला नक्कीच भेट द्या. हे संग्रहालय अल्मोरा येथे स्थित असलेल्या मॉल रोडवर आहे. या संग्रहालयात सुंदर कलाकृती, प्राचीन कलाकृती आणि स्वातंत्र्यलढ्यांशी संबंधित वस्तूंचे प्रदर्शन तुम्हाला पाहायला मिळेल. (Photo Credit : Freepik)

4/7

कटरमल सूर्य मंदिर

Uttarakhand travel tips

अल्मोडामधील दुसरे सर्वात प्रसिद्ध मंदिर म्हणून ओळखले जाते. कटरमल सूर्य मंदिर 800 वर्षांपूर्वी कत्युरी शासकांनी बांधले होते. हे मंदिर प्रामुख्यानं सूर्यदेवाला समर्पित आहे. दरम्यान, मंदिराभोवती विविध देवतांना समर्पित अशी इतर 44 मंदिरे देखील आहेत. (Photo Credit : Social Media)

5/7

झिरो पॉइंट

Uttarakhand travel tips

अल्मोडा येथे स्थित, झिरो पॉइंट येथून हिमालयातील बर्फात लपलेले मोठे मोठे शिखर पाहायला मिळतात. केदारनाथ, शिवलिंग आणि नंदा देवी यांसारखी सुंदर ठिकाणे पाहण्यासाठी झिरो पॉइंट एक उत्तम ठिकाण आहे, असे म्हटले जाते. (Photo Credit : Social Media)

6/7

डीअर पार्क

Uttarakhand travel tips

निसर्गप्रेमींसाठी अल्मोडा येथील डीअर पार्कला भेट देणे हा एक उत्तम अनुभव असू शकतो. हे पार्क त्यांच्या हरणांसाठी प्रसिद्ध आहे आणि विविध हिमालयीन पशु पक्षी तुम्हाला इथे पाहायला मिळू शकतात. हरणांव्यतिरिक्त, या उद्यानात अस्वल आणि बिबटे देखीलजवळून  पाहू शकता. (Photo Credit : uttarakhanddarshan) 

7/7

बिनसार वन्यजीव अभयारण्य

Uttarakhand travel tips

अल्मोडापासून 33 किलोमीटर अंतरावर असलेले बिनसार वन्यजीव अभयारण्य देखील खूप लोकप्रिय आहे. 1988 मध्ये स्थापन झालेले हे अभयारण्य मध्य हिमालयाच्या रांगेत वसलेले आहे. 45 किलोमीटरवर पसरलेले हे अभयारण्य वाघ, बिबट्या, हरीण, लंगूर आणि वुडपेकर यांसारख्या प्राण्यांचे निवासस्थान आहे. (Photo Credit : uttarakhandgyanganga)