Weekly Numerology : 'या' मूलांकांच्या लोकांसाठी कभी खुशी कभी गम! तुमच्या नशिबात काय?
Saptahik Ank jyotish 24 to 30 june 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 24 ते 30 जूनपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.
1/9
मूलांक 1

प्रेम संबंधांमध्ये शांतता असणार आहे. शिवाय प्रेम जीवनात आनंद दार ठोठावणार आहे. या आठवड्यात आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. भावनिक कारणांमुळे खर्च जास्त होणार आहे. कामाच्या ठिकाणी अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. आपण अहंकार संघर्ष टाळल्यास, चांगले परिणाम दिसून येणार आहेत. आठवड्याच्या शेवटी स्थिती हळूहळू सुधारणार आहे.
2/9
मूलांक 2

नोकरीच्या ठिकाणी प्रगती होणार असून मान-सन्मानही वाढणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रकल्पात सुधारणा करण्याच्या अनेक संधी लाभणार आहेत. प्रेमसंबंधांमध्ये परस्पर प्रेम मजबूत होणार असून प्रेम जीवनात आनंदच आनंद असणार आहे. या आठवड्यात कठोर परिश्रमाने तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. आठवड्याच्या शेवटी आनंददायी काळ असणार आहे.
3/9
मूलांक 3

कामाच्या ठिकाणी प्रगती होणार असून भागीदारीत केलेली कामं तुमच्यासाठी चांगली परिस्थिती निर्माण करणार आहेत. आर्थिक बाबतीत काळ अनुकूल असणार आहे आणि धनवृद्धीसाठी शुभ संधी मिळणार आहेत. या आठवड्यात घेतलेल्या व्यावसायिक सहली यशस्वी होणार आहेत. आर्थिक लाभ वाढणार आहे. प्रेम संबंधात तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. परिस्थिती तुमच्यासाठी वेदनादायक असण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी अहंकाराचे भांडण टाळले तर हिताच ठरेल.
4/9
मूलांक 4

व्यावसायिकदृष्ट्या, या आठवड्यात तुम्हाला शुभ परिणाम मिळणार आहेत. प्रकल्प देखील वेळेवर पूर्ण होणार आहे. आर्थिक स्थिती देखील हळूहळू सुधारणा होणार आहे. शेवटी गुंतवणुकीतून नफा लाभणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रेम जीवनाबद्दल खूप चिंतेत असणार आहे. तुम्हाला थोडे अस्वस्थ वाटू शकते. आठवड्याच्या शेवटी, परिस्थिती बदलणार आहे.
5/9
मूलांक 5

या आठवड्यात तुम्ही एकाच वेळी अनेक कामं करण्यास इच्छुक असणार आहात. ज्यामुळे तुम्हाला जीवनात चढ-उतारांना सामोरे जावं लागणार आहे. जर तुम्हाला तुमचे प्रेमसंबंध सुधारायचे असतील तर तुम्हाला त्याकडे लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. आर्थिक बाबतीत निष्काळजीपणामुळे खर्च जास्त होणार आहे. आठवड्याच्या शेवटी प्रतिकूल जीवनातील परिस्थिती हळूहळू सुधारणार आहे.
6/9
मूलांक 6

आर्थिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल असून संपत्तीत वाढ होण्याचे शुभ संकेत आहे. तुमच्या गुंतवणुकीमुळे तुम्ही आनंदी असणार आहात. प्रेमसंबंधांमध्ये संयमाने घेतलेले निर्णय तुमच्या बाजूने निर्णय घेणार आहात. आठवड्याच्या उत्तरार्धात तुमच्या कार्यक्षेत्रात अचानक सुधारणा होणार आहे. तुमचे मन प्रसन्न असणार आहे. आठवड्याच्या शेवटी, कोणत्याही प्रकारचा बाह्य हस्तक्षेप तुमच्या जीवनात त्रासदायक ठरु शकते.
7/9
मूलांक 7

नोकरीच्या ठिकाणी प्रगती होणार तर आहेच शिवाय मान-सन्मानही वाढणार आहे. भागीदारीत केलेली कामं तुम्हाला यशाच्या मार्गावर हळूहळू पुढे नेणार आहे. प्रेमसंबंधातील मुद्दे संवादाने सोडवले तर चांगले परिणाम मिळतील. आर्थिक बाबतीत या आठवड्यात महिलांवर जास्त खर्च करणारा ठरणार आहे. सप्ताहाच्या शेवटी काही दानधर्म करणे फायद्याचे ठरेल. तरच जीवनात सुख-शांती नांदेल.
8/9
मूलांक 8

कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. तुम्ही तुमच्या मेहनतीच्या जोरावर प्रगतीच्या मार्गावर पुढे जाणार आहात. या आठवड्यात तुम्हाला महिलांकडूनही पूर्ण सहकार्य लाभणार आहे. आर्थिक बाबतीतही काळ अनुकूल असणार आहे. गुंतवणुकीतून चांगला नफा तुम्हाला मिळणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये परस्पर प्रेम मजबूत होईल. प्रेम जीवनात आनंदच आनंद असेल. आठवड्याच्या शेवटी वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात सुखद अनुभव तुम्हाला प्रसन्न करणार आहे.
9/9
मूलांक 9
