Mayank Agarwal: बिलकुल रिस्क नहीं लेने का बाबा...; विमानातील अपघातानंतर मयंकचा मोठा निर्णय

Mayank Agarwal: गेल्या काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा क्रिकेटर मयांक अग्रवालसोबत विमानात एक मोठी घटना घडली. यानंतर आता मयंकचा एक फोटो व्हायरल होतोय.

Surabhi Jagdish | Feb 20, 2024, 10:44 AM IST
1/7

कर्नाटक रणजी टीमचा कर्णधार अग्रवाल त्रिपुराविरुद्धचा सामना खेळल्यानंतर विमानात चढला तेव्हा त्याने चुकून आपल्या सीटवर ठेवलेल्या बाटलीतून काही विषारी पेय प्यायला.

2/7

मयंकला ते पाणी वाटलं आणि तो प्यायला. दरम्यान हे विषारी द्रव्य प्यायल्यानंतर तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं.

3/7

यानंतर आता मयंकने सोशल मीडियावर एक पोस्ट केलीये. ज्यामध्ये त्याने बॉटलसोबत स्वतःचा फोटो क्लिक केलाय.

4/7

मयंक अग्रवाल आता स्वतःची पाण्याची बाटली घेऊन जातो. गेल्या महिन्यात एका भारतीय क्रिकेटरसोबत अपघात झाला होता, त्यानंतर त्याने असं करण्याचा निर्णय घेतलाय.

5/7

दरम्यान या फोटोला कॅप्शन देताना मयंकने लिहिलंय की,‘बिलकुल रिस्क नहीं लेने का रे बाबा.’

6/7

अग्रवाल यांना पोटदुखी, अंगावर सूज आणि तोंडात व्रण आल्याने त्याला संशय आला. 

7/7

या संपूर्ण प्रकरणानंतर अग्रवाल यांनी त्यांच्या मॅनेजरमार्फत या प्रकरणाची अधिक चौकशी व्हावी म्हणून तक्रार दाखल केली.