मोमोज खायला आवडतात? पण माहितीये का त्याला Momos नाव कसं पडलं? जाणून घ्या इतिहास

History Of Momos: जर तुम्हालादेखील मोमोज खाण्याचे वेड असेल, तर तुम्हाला यासंदर्भात काही मजेशीर गोष्टी जाणून आनंद होईल. जेव्हा काहीतरी झणझणीत आणि चविष्ट खावेसे वाटते, तेव्हा सर्वप्रथम मनात मोमोजचं नाव येतं. आजकाल मोमोज तर कित्येकांच्या दैनंदिन आहाराचा एक भाग झाला आहे.

Feb 14, 2025, 17:03 PM IST
1/6

अनेकांना वाटतं की मोमोज फक्त आशियाई देशांमध्ये प्रसिद्ध आहेत, पण खरं तर हे जगभर लोकप्रिय झाले आहेत. आजकाल ओपन मोमोज आणि वेगवेगळ्या चवीचे मोमोजही बाजारात मिळतात, जसे की चॉकलेट मोमोज, चीज मोमोज, आणि मसालेदार तंदूरी मोमोज. तर मग मोमोजशी संबंधित काही रंजक माहिती जाणून घेऊया.

2/6

मोमोजचा अर्थ काय?

मोमोज हा खाद्यपदार्थ भारतात तिबेटमधून आलेले आहे. पण तुम्हाला माहित आहे का, ‘मोमो’ हा शब्द कुठून आला? हा शब्द तिबेटियन भाषेतील "मॉग-मॉग" (Mog-Mog) वरून घेतला आहे, ज्याचा अर्थ "स्टफ्ड बन" म्हणजेच आतून भरलेला ब्रेड असा होतो. तसेच, नेपाळी भाषेत "Mome" (मोम) चा अर्थ "वाफेवर शिजवलेले पदार्थ" असा होतो. मोमोज आता केवळ तिबेट किंवा नेपाळपुरते मर्यादित नाहीत, तर संपूर्ण भारतात आणि जगभर लोकप्रिय झाले आहेत. स्ट्रीट फूड मार्केटमध्ये मोमोजच्या वेगवेगळ्या व्हेरायटी दिसत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला मोमोज आवडत असतील, तर तुम्ही त्यांचे वेगवेगळे प्रकार नक्की चाखून बघा.

3/6

मोमोजमध्ये किती कॅलरीज असतात?

हे जाणून काही लोकांना आनंद होईल, तर काहींना थोडा धक्का बसेल. एका मोमोमध्ये सुमारे 35.2 एवढी कॅलरी असतो. म्हणजेच जर तुम्ही एकावेळी 7-8 मोमोज खाल्ले, तर 250-300 कॅलरी तुमच्या शरीरात जाते. जर ते फ्राय केलेले असतील, तर त्यातील कॅलरीज 500 च्या वर जातात.

4/6

मोमोजच्या विविध शेप्स आणि प्रकार

मोमोजचे अनेक प्रकार आणि आकार असतात. हाफ मून शेप: हा आकार करंज्यासारखा दिसतो. सर्क्युलर मोमो: पूर्ण गोलसर असतो. ओपन मोमो: यात सारण वरून दिसतं आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यात पदार्थ भरू शकता.

5/6

मोमोज आणि आरोग्यावर परिणाम

मोमोज हे स्वादिष्ट असले तरी रोज त्याचं सेवन करणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. मोमोजमध्ये मोनो-सोडियम-ग्लूटामेट (MSG) नावाचा पदार्थ असतो, जो जास्त प्रमाणात खाल्ल्यास लठ्ठपणा वाढतो. नर्व्हस डिसऑर्डर, छातीत दुखणे, घाम येणे, आणि हृदयाची धडधड वाढणे यांसारख्या समस्यादेखील उद्भवतात.  

6/6

मोमोज बनवण्याचे विविध प्रकार

स्टीम मोमोज- वाफेवर शिजवलेले, हे तुलनेने कमी तेलकट असतात. फ्रायड मोमोज- तेलात तळलेले, अधिक कुरकुरीत पण जास्त कॅलोरीयुक्त. पॅन-फ्रायीड- मोमोज  हलकं तळलेले, आतून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत.  तंदूरी मोमोज- तंदूरमध्ये शिजवलेले मोमोज.