एकही आमदार, खासदार नसलेल्या मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द होणार?

मनसेला विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही. एवढच नाही तर मनसेच्या मतांची टक्केवारीही घसरली आहे.     

Shivraj Yadav | Nov 24, 2024, 17:11 PM IST

मनसेला विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही. एवढच नाही तर मनसेच्या मतांची टक्केवारीही घसरली आहे. 

1/8

मनसेला विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही. एवढच नाही तर मनसेच्या मतांची टक्केवारीही घसरली आहे.   

2/8

या विधानसभा निवडणुकीत मनसेला केवळ १.५५ टक्केच मतं मिळाली आहेत.   

3/8

त्यामुळे मनसे चिन्ह राहणार का ? नोंदणीकृत पक्ष म्हणून मान्यता कायम राहणार का ?  असे प्रश्न उपस्थित होत आहेत.  

4/8

पक्षाची नोंदणी ही निवडणूक आयोगाकडे असते त्याची मान्यता देण्याची प्रक्रिया निवडणूक आयोग करतो. जर त्या नियमात बसत नसेल तर ती मान्यता आपोआप कमी होत असते असं घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी सांगितलं आहे.   

5/8

मात्र इंजिन चिन्ह मनसेला वापरता येऊ शकतं कारण ते राजकीय पक्षासाठी राखीव केलेला असतो असंही ते म्हणाले आहेत.  

6/8

त्यांना पुन्हा मान्यता हवी असेल तर निवडणुकीला सामोरे जाऊन संपूर्ण निवडणूक आयोगाच्या नियमाची पूर्तता केल्यानंतर मान्यता मिळते नाही तर मनसे हा फक्त नोंदणीकृत पक्ष म्हणून राहू शकतो अशी माहिती त्यांनी दिली आहे.   

7/8

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय निर्णय होतो हे पाहावं लागणार आहे. 

8/8