उर्फीशी लग्न करणार? पापाराझींनी प्रश्न विचारताच ऑरीनं दिलं असं उत्तर
आजकाल सोशल मीडियावर अनेक गोष्टी सहज व्हायरल होतात आणि बराच काळ चर्चेतही राहतात. एक अशी वेळ होती जेव्हा सोशल मीडियावर फक्त उर्फी जावेदच्या चर्चा सुरु असायच्या. ती आजही तिच्या आउटफिट्ससाठी सगळ्यांमध्ये चर्चेत राहते. आता तिच्या कॉम्पिटीशनमध्ये एक नवीन नाव समोर आलं आहे असं म्हणायला हरकत नाही आणि ते म्हणजे ऑरी. आता ऑरीचे सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्याचे आपण पाहतो. आता पहिल्यांदा ते दोघं एकत्र स्पॉट झाले आहेत. यावेळी त्यांच्या लग्नाविषयी ते बोलताना दिसले.





