शरीरातील 'या' एकाच अवयवावर तंबाखूचा सर्वाधिक परिणाम, व्यसन सोडण्याचे 5 उपाय

World No Tobacco Day : तंबाखू शरीराला आतून पोखरतं पण एका अवयवावर होतो सर्वाधिक परिणाम, कॅन्सर होण्याची जोखीम वाढते. अशावेळी टोबॅको-सिगरेट सोडण्यासाठी 5 उपाय समजून घ्या. 

आज 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश लोकांमधील तंबाखूचे सेवन रोखण्यासाठी जागरुरता निर्माण करणे. तंबाखू शरीरासाठी अतिशय घातक आहे. यामुळे तोंड, गळा, फुफ्फुस यांना सर्वाधिक धोका असतो. मात्र तंबाखूमुळे शरीरातील एकाच अवयवावर सर्वाधिक परिणाम होतो. 

रिपोर्टनुसार, भारतात तंबाखूच्या सेवनाने प्रतिवर्षी जवळपास 4 लाख लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे हा चिंतेचा विषय आहे. अशावेळी तंबाखू शरीरातील कोणत्या भागाला जास्त घातक आहे हे ओळखून हे व्यसन सुटण्यासाठी काय उपाय करावेत हे समजून घेऊया. 

1/8

फुफ्फुसाचे सर्वाधिक नुकसान

World No Tobacco Day 2024

तंबाखूचे सेवन केल्याने फुफ्फुसातील वायुमार्ग आणि लहान वायु पिशव्या खराब होतात. ही स्थिती एखाद्या व्यक्तीने धूम्रपान सुरू केल्यानंतर लगेच सुरू होऊ शकते आणि जोपर्यंत ती व्यक्ती धूम्रपान करत आहे तोपर्यंत हा त्रास तसाच राहतो. तंबाखूचे सेवन केल्याने फुफ्फुसांच्या कार्यावर याचा विपरित परिणाम होतो. 

2/8

COPD चा धोका

World No Tobacco Day 2024

धुम्रपान केल्यामुळे फुफ्फुसाचे सर्वाधिक नुकसान होते. ज्यामुळे क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव पल्मोनरी डिजीज (COPD) सारखा गंभीर आजार होतो. अशा परिस्थितीत असलेल्या व्यक्तीला क्रॉनिक ब्रोकांयटिस आणि एम्पसीमाचा धोका असतो. COPD मध्ये फुफ्फुसात छोटा वायुमार्गाला सर्वाधिक धोका पोहोचतो. यामुळे शरीरातील इतर अवयवांमध्ये ऑक्सिजन पोहोचण्यास अडथळा निर्माण होतो. धूम्रपान आतापर्यंत COPD चे सर्वाधिक सामान्य कारण आहे. याची सुरुवातीची लक्षणे छातीमधून आवाज, श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे, कफ जमा होणे.   

3/8

क्रोनिक ब्रोंकायटिस

World No Tobacco Day 2024

अधिक काळ धूम्रपान केल्यास अनेकांना क्रोनिक ब्रोंकायटिसचा धोका निर्माण होतो. अशा स्थितीमध्ये वायुमार्गात सर्वाधिक कफ निर्माण होतो. अशा व्यक्तीला भरपूर प्रमाणात खोकला. महत्त्वाचं म्हणजे हा खोकला इतका जुना होतो ज्यामुळे क्रोनिक ब्रोंकायटिसचा त्रास सुरु होतो. 

4/8

एम्फसीमा

World No Tobacco Day 2024

एम्फसीमा ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये फुफ्फुसातील लहान हवेच्या पिशव्यांमधील भिंती तुटतात. ज्यामुळे मोठ्या परंतु कमी हवेच्या पिशव्या तयार होतात. त्यामुळे रक्तापर्यंत ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. या पिशव्या इतक्या प्रमाणात फुटू शकतात की, एम्फसीमा ग्रस्त व्यक्ती विश्रांती घेत असताना देखील पुरेशी हवा मिळविण्यासाठी संघर्ष करते. श्वसनाची समस्या निर्माण होते. 

5/8

फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका

World No Tobacco Day 2024

धुम्रपान करणाऱ्या लोकांना फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका निर्माण होतो. धूम्रपानाची सवय फुफ्फुसाच्या कॅन्सरला कारणीभूत ठरते. अनेक वर्षांपर्यंत धूम्रपान केल्यामुळे फुफ्फुसावर ताण पोहोचतो. अशामुळे सिगरेट, तंबाखूची सवय सोडणे अत्यंत गरजेचे आहे. अशावेळी पुढील पद्धतीने तुम्ही ही सवय सोडू शकता. 

6/8

संगत महत्त्वाची

World No Tobacco Day 2024

सिगरेट, तंबाखू खाणारी व्यक्तीच्या जीवनात संगत महत्त्वाची आहे. कारण संगतीमुळेच ही सवय त्यांना लागते. अशावेळी काही दिवस स्मोकिंग करणाऱ्या लोकांपासून थोडे लांब राहा. त्यामुळे आपण कोणत्या व्यक्तींसोबत जास्त काळ राहतो, हे नीट ओळखणे, समजून घेणे गरजेचे आहे. 

7/8

स्मोकिंगचे नुकसान समजून घ्या

World No Tobacco Day 2024

अनेकदा स्टाईल स्टेटमेंट म्हणून सिगारेट ओढू लागतात. पण त्याचे दुष्परिणाम त्यांना माहीत नसतात. स्मोकिंग केल्याने आरोग्य कसे खराब होऊ शकते याची जाणीव त्या व्यक्तीला करुन देणे. जवळच्या व्यक्तीचा संवाद अशावेळी महत्त्वाचा ठरतो.   

8/8

समुपदेशन करा

World No Tobacco Day 2024

अंमली पदार्थांच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी त्या व्यक्तीला समुपदेशकाकडे न्या. समुपदेशन आणि थेरपीच्या मदतीने हे व्यसन सोडण्यास मदत केली जाऊ शकते. अशावेळी डॉक्टर आणि काऊन्सिलिंगची मदत घेणे आवश्यक आहे.