ओम-स्वीटू : मैत्रीचा लॉकडाऊन संपून सुरु होणार प्रेमाचा अनलॉक

ओम स्वीटूच्या मैत्रीत येणार प्रेमाचं नवं वळण

Dakshata Thasale | Apr 07, 2021, 08:49 AM IST

मुंबई : एका गोड नात्याची कथा सांगणारी झी मराठीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' (Yeu Kashi Tashi Mi Nandayala) या मालिकेला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला अल्पावधीतच ही मालिका लोकप्रिय झाली आहे. ‘अन्विता फलटणकर’ आणि ‘शाल्व किंजवडेकर’ ह्या फ्रेश जोडीने तरुणाईवर छाप सोडली आहे. प्रत्येक पावलावर स्वीटूला मदत करणारा आणि तिच्या सोबत सावली सारखा उभा राहणारा ओम या दोघांमध्ये घट्ट मैत्री आहे. आता आता ही मालिका एका वेगळ्या वळणावर आली आहे, 

1/4

 ओम आणि स्वीटूच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर होताना दिसणार आहे. ओम स्वीटू ला प्रपोज करणार आहे.   

2/4

स्वीटू ला देखील हे सुंदर क्षण खूप हवेहवेसे वाटतायत, काय असेल स्वीटू चं उत्तर?

3/4

आता ह्या दोघांमध्ये असलेली श्रीमंती आणि गरिबीची दरी या नात्यात अडथळा ठरेल? काय असेल मालविक, मोहित आणि मोमो ची प्रतिक्रिया? 

4/4

शकू(आई) आणि रॉकीच्या मदतीने ओम नलू मावशी आणि साळवी कुटुंबाकडून दोघांमध्ये बहरणाऱ्या या नवीन नात्याला होकार मिळवू शकेल? या सर्व उत्तरांसाठी पाहत राहा येऊ कशी तशी मी नांदायला सोमवार ते शनिवार रात्री ८ वा. फक्त आपल्या झी मराठी