कानोसा मुंबईचा : हे उमेदवार बाजी मारणार?
लोकसभा निवडणुकीचे निकाल २३ मे रोजी लागणार आहेत. त्याआधी झी २४ तासने महाराष्ट्रातल्या सगळ्या ४८ मतदारसंघाचा कानोसा घेतला. यावेळी मुंबईत भाजप-शिवसेना युती समाधानकारक कामगिरी असली तरी काही ठिकाणी धक्कादायक पराभवाचे चित्र पाहायला मिळणार आहे. मुंबईत काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. झी २४ तासने आपला निवडणूक निकालाबाबत कानोसा घेतला आहे.

कोकण आणि मुंबई या विभागात एकूण १२ मतदारसंघ येतात. यात शिवसेना ५, भाजप ४, काँग्रेस १, राष्ट्रवादी १ आणि बविआ १ अशा जागा जिंगण्याची शक्यता आहे. मुंबईत ६ जागा आहेत. येथे युतीच्या दोन जागा कमी होण्याचा धोकाही आहे. या जागा काँग्रेस आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे युतीला फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र, मुंबईत भाजपला यश मिळताना दिसत आहे. तर मुंबईत शिवसेनेलाच फटका बसताना दिसत आहे. भाजपने आपली कामगिरी चांगली केल्याचे दिसत आहे. दक्षिण मुंबईतून काँग्रेसचे मिलिंद देवरा जिंकण्याची शक्यता असून शिवसेनेचे अरविंद सावंत यांना पराभवाचा सामना पत्करावा लागणार आहे.
कानोसा मुंबईचा : हे उमेदवार बाजी मारणार?

कानोसा मुंबईचा : हे उमेदवार बाजी मारणार?

कानोसा मुंबईचा : हे उमेदवार बाजी मारणार?

उत्तर पूर्व मुंबईत भाजपने येथे भाकरी फिरवली आहे. विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना डावलून मनोज कोटक यांना उमेदवारी दिली. ते जिंकण्याची शक्यता आहे. मात्र राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांनी जोरदार टक्कर देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जरी भाजपला कौल मिळत असला तरी कोटक यांच्यासाठी धोक्याची घंटा असू शकते. ते २३ मे रोजीच स्पष्ट होईल.