कानोसा कोकणचा : हे उमेदवार बाजी मारणार?
एक्झिट पोलनंतर राज्यात काय परिस्थिती असेल याचे अंदाज बांधण्यात आले होते. मात्र, राज्यात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. झी २४ तासने आपला निवडणूक निकालाबाबत अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार निकालाचे चित्र वेगळे असून शकते असेच दिसून येत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत युतीची कामगिरी चांगली होती. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत युतीला मोठा फटका बसताना दिसत आहे. त्यांच्या जागा कमी होताना दिसत आहेत. कोकण येथील जागांचा विचार करताना शिवसेनेला फटका बसताना दिसत आहेत. मात्र, भाजप आपली कामगिरी चांगली करेल, असे येथे चित्र पाहावयाला मिळत आहेत.

कोकणात रायगडमध्ये शिवसेनेचा दबदबा आहे. मात्र, यावेळी शिवसेनेला नाराजीचा फटका बसण्याची शक्यता असून सेनेला फटका बसताना दिसत आहे. येथे राष्ट्रवादी जम बसविणार असे दिसत आहे. रायगडमधून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे जिंकतील तर विद्यमान खासदार आणि उद्योगमंत्री अनंत गिते यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी हा मोठा धक्का असेल. मात्र, खरे चित्र हे २३ मे र ोजी स्पष्ट होणार आहे.

पालघर जागा भाजपने जिंकली होती. पोटनिवडणुकीतही भाजपने बाजी मारली. मात्र, युती झाल्यानंतर ही जागा भाजपने शिवसेनेला सोडली. मात्र ही जागा शिवसेनेला राखता येणार नाही, असे चित्र दिसून येत आहे. ही जागा बहुजन विकास आघाडीला जाण्याची शक्यता आहे. येथे काँग्रेस आघाडीने बविआला पाठिंबा दिला आहे. याचा फटका युतीला बसतो आहे. त्यामुळे बविआचे बळीराम जाधव हे जिंकणार असून शिवसेनेचे राजेंद्र गावीत हरण्याची शक्यता आहे.