मुंबई : शिवसेना नेते रघुनाथ कुचिकवर बलात्काराचा आरोप करणारी पीडित तरुणी बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. पीडितेनं आत्महत्या करत असल्याची पोस्ट लिहिल्यानंतर गायब झाल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. यावरून चित्रा वाघ यांनी रघुनाथ कुचिकवर हल्लाबोल केला आहे. कुचिकवर 307 चा गुन्हा दाखल करून पीडितेला आधी शोधा. तिच्या जिवाचं बरं वाईट झाल्यास सरकार आणि पोलीस जबाबदार असतील असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय.
पुण्यातील शिवसेना नेता रघुनाथ कुचिकवर एका तरुणीवर बलात्कार आणि गर्भपात प्रकरणी गुन्हा दाखल आहे. संबधित तरुणीने काल फेसबुक पोस्ट करीत कुचिकच्या त्रासाला कंटाळून 'आता माझ्यात जिवंत राहण्याची क्षमता नाही' असे म्हटले होते. ती तरुणी आता गायब झाल्याची माहिती मिळत आहे. त्यावर भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र शब्दात टीका करीत ती तरुणी आता गायब आहे. तिला वाचवा असे म्हटले आहे. तसेच तिचे बरे वाईट झाल्यास पुणे पोलीस आणि राज्य सरकार त्याला जबाबदार असेल असे म्हटले आहे.
'शिवसेना नेता रघुनाथ कुचिक याने एका तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर तिचा गर्भपात केला. त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला परंतू तो जामीनावर बाहेर आहे. 'केस मागे घे' म्हणून पीडित तरुणीवर कुचिक दबाव टाकत आहे. पीडित मुलीने आज फेसबुक पोस्ट केली आहे की, ती स्वतःला संपवत आहे. त्या मुलीने खरंच स्वतःचे बरे वाईट केले तर, त्याची जबाबदारी पुण्याचे पोलीस आयुक्त, रघुनाथ कुचिक आणि राज्य सरकारची असेल.
1️⃣ हाचं तो हरामखोर बलात्कारी शिवसेना पुण्याचा नेता रघुनाथ कुचिक….
ज्याने एका मुलीवर बलात्कार केला व जबरदस्तीने गर्भपात ही करवला
न्याय मिळत नाही म्हणून आत्महत्या करतं स्वत:ला संपवते म्हणत तीने काल FB पोस्ट केली अजूनही त्या मुलीचा तपास लागत नाहीये..ती गायब आहे @AjitPawarSpeaks pic.twitter.com/WOD7BQ6QaJ
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 14, 2022
तिने फेसबुकवर केलेल्या पोस्ट मी स्वतः गृहमंत्री, पुण्याचे पोलीस आयुक्त, उपायुक्त सहआयुक्त अनेकांना केले आहेत. मॅसेजेस पाहिले त्याला त्यांचा रिप्लाय नाही. जिवंत हाडामासाच्या मुलीला तुम्ही न्याय देऊ शकत नसाल तर, तिचं बरं वाईट झाले तर ती जबाबदारी राज्य सरकारचीच असेल. पुणे पोलिसांच्या लेखी महाराष्ट्राच्या लेकींची किंमत आहे हे दिसून आलंय. पुन्हा एकदा हात जोडून विनंती करते की त्या मुलीला वाचवा.
काल मी स्वतःचा जीव द्यायच्या विचारात चालले होते. त्यातून पोलिसांनी मला समजावून सांगून माझी मनस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. मी माझी समजून घ्यायची मानसिकता नसताना देखील त्यांचा आदर ठेवत ते ऐकले. आणि माझ्या वडिलांसोबत घरी सुद्धा गेले. पण आज परत रघुनाथ कुचिक यांनी मला व्हॉट्सॲप वर हिणवत मेसेज केले.. मी काल जे काही करत होते त्यासाठी मला नको नको ते बोलले..
किती काळ मी सतत हा त्रास सहन करायचा.. सतत त्यांची लोक मित्र मला मेसेज करून त्रास देतात खूप कंटाळले आहे मी या सगळ्याला. काल मी जे करणार होते तेच योग्य होत आता माझ्यात जिवंत राहण्याची क्षमता नाही आणि सहनशक्ती तर त्याहून नाही आणि त्याही व्यक्तीला मी मेलेलीच हवीय.. माझ्या मरणाने हे सगळं थांबणार असेल आणि त्यांचा जीव ते केल्याने भरणार आहे.. असही माझ्या आयुष्याची राख रांगोळी करून सगळंच संपवले आहे आता मी मरण्याची इच्छा सुद्धा पूर्ण होईल त्यांची.
पुण्यातील शिवाजीनगर ठाणे पोलीस ठाण्यात शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. एका 24 वर्षे तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे. रघुनाथ कुचिक यांनी या तरुणीला विवाहाचे आमिष दाखवलं आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून ही तरुणी गर्भवती राहिली. परंतु कुचिक याने तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले असा आरोप करण्यात आलाय. गर्भपात न केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे