मुंबई : रमजानसारख्या पवित्र महिन्यात एका निरागस मुलाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये तो रमजानचा खरा हेतू आणि योग्य पद्धतीने साजरा करण्यास प्रवृत्त करत आहे. त्याच वय पाहता आई त्याला रोजा न ठेवण्यास सांगते. पण कोणत्या ना कोणत्या पद्धतीने तो रमजान साजरा करतो हे पाहण्यासारख आहे. या मुलाचा अभिनय सर्वांच्या मनाला भावतो. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा रोजा ठेवण्यासाठी आईकडे हट्ट धरतो. पण आई त्याला तस करण्यास देत नाही. रमजान साजरा करण्याचा त्याच्याकडे एक प्लान असतो.
ज्यांच्यावर तो प्रेम करतो त्यांच्यासाठी तो काहीनाकाही चांगल करू लागतो. पिगी बॅंकमधून पैसे काढून तो नेहमी भांडण होणाऱ्या बहिणीला प्रेमाने चॉकलेट आणून देतो. त्यानंतर तो शेजारच्या काकांनाही मदत करतो. याच मुलाने पॉकेट मनीतून आपल्या आज्जीसाठी खजूरदेखील खरेदी केले आहेत. सर्वात शेवटी तो आईकडे पोहोचतो. ती जेवण बनवत असते. तो आईची मदत करतो. त्यामुळे आईदेखील आनंदी होते. इफ्तारवेळी जेव्हा सर्व परिवार एकत्र बसतो तेव्हा मुलाचा चेहरा बघण्यासारखा असतो. भलेही त्याने रोजा ठेवलेला नसतो पण मनापासून रमजान साजरा केलेला असता. ही रिलायन्स फ्रेशची जाहीरात आहे. रमजान फक्त रोजा नाही तर छोट्या छोट्या आनंदाने साजरा केला जाऊ शकतो असा संदेश यातून दिला गेलायं.