1/11
2/11
९) वर्ल्ड कप २००७ : वर्ल्ड कप २००७ च्या फायनलमध्ये श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात अॅडम गिलक्रिस्टने १२९ चेंडूत १४९ धावा केल्या होत्या, आणि त्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकण्याची हॅट्रिक साजरी केली होती. या सामन्यात अॅडम गिलक्रिस्टला 'मॅन ऑफ द मॅच' म्हणून गौरविण्यात आले होते.
3/11
८) वर्ल्ड कप २००३ : २००३ची ती फायनल भारतीयांना चांगलीच आठवत असेल. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात रिकी पॉंटिंगने भारताला अक्षरश: धुतले होते. त्याच्या १४० रन्सच्या जोरावर दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले होते. त्याच्या त्या शानदार शतकाचा पुरस्कार 'मॅन ऑफ द मॅच'च्या रूपात त्याला मिळाला.
4/11
5/11
६) वर्ल्ड कप १९९६ : १९९६ च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने बाजी मारली होती. अरविंद डी'सिल्वाच्या नाबाद १०७ धावा आणि ४२ धावा देऊन ३ विकेटच्या जोरावर श्रीलंकेने १९९६ चा वर्ल्ड कप जिंकला होता. त्याच्या त्या खेळीसाठी त्याला 'मॅन ऑफ द मॅच'चा पुरस्कार देण्यात आला होता.
6/11
५) वर्ल्ड कप १९९२ : १९९२ च्या वर्ल्डकप फायनलमध्ये इंग्लड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडला पराभूत केले होते. या सामन्यात वसीम आक्रमने ३३ धावा केल्या, तसेच ४९ धावा देऊन ३ विकेटही घेतल्या होत्या. त्याच्या त्या जादुई बॉलिंच्या जोरावर वर्ल्ड कपवर पाकिस्तानने आपले नाव कोरले होते. त्याच्या त्या खेळीसाठी त्याला 'मॅन ऑफ द मॅच'ने गौरविण्यात आले होते.
7/11
४) वर्ल्ड कप १९८७ : १९८७च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. या सामन्यात डेव्हिड बून यांच्या ७५ धावांच्या खेळीच्या जोरावर पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकला होता. त्यांच्या या महत्वाच्या खेळीसाठी त्यांना 'मॅन ऑफ द मॅच'चा पुरस्कार देण्यात आला होता.
8/11
३) वर्ल्ड कप १९८३ : १९८३ची वर्ल्ड कप फायनल भारतीयांसाठी एक अभिमानाचा क्षण होता. वेस्टइंडीज विरूद्धच्या सामन्यात मोहिंदर अमरनाथ यांच्या ऑलराउंड कामगिरीमुळे भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वात 1983चा वर्ल्डकप जिंकला. मोहिंदर यांनी फक्त १२ धावा देऊन तीन विकेट घेतल्या होत्या आणि २५ धावा काढल्या होत्या. त्यांच्या त्या खेळीसाठी त्यांना 'मॅन ऑफ द मॅच'चा पुरस्कार देण्यात आला होता.
9/11
२) वर्ल्ड कप १९७९ : १९७९च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये पुन्हा एकदा इंग्लड विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यात झालेल्या फायनल मॅचमध्ये पुन्हा बाजी वेस्ट इंडीजनं मारली होती. वर्ल्डकपच्या फायनल मॅचमध्ये वेस्टइंडीजच्या विवियन रिचर्ड्स यांनी १३८ धावांची महत्वपूर्ण शतकी खेळी केली होती.
त्यांच्या त्या खेळीसाठी त्यांना 'मॅन ऑफ द मॅच'चा पुरस्कार देण्यात आला होता.
10/11